विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचा शासन निर्णय (आदेश) जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार, शाळेच्या दाखल्याविनाही विद्यार्थ्यांना अनुदानित आणि सरकारी शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी केवळ जन्मप्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. दाखल्याविना विद्यार्थ्यांना यापुढे प्रवेश नाकारता येणार नाही. मात्र, हा नियम खासगी शाळांना लागू असणार नाही. कोरोना संकटामुळे अनेक पालक विद्यार्थ्यांची फी भरु शकलेले नाही. त्यामुळे अन्य शाळेत त्यांना प्रवेश मिळण्यात अडचणी येत आहेत. यासंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्यानंतर विभागाने हा निर्णय घेतला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार कुठल्याही स्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
सरकारने काढलेला आदेश असा