मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात इंधनासह विविध प्रकारचे दर वाढत असताना आता रेडिरेकनर (जागांचे सरकारी मूल्य) दरवाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारने ही दरवाढ जाहीर केली आहे. हे नवे दर १ एप्रिलपासून म्हणजे उद्यापासूनच लागू होणार आहेत. २०२२-२३ या वर्षासाठीचे रेडिरेकनर दर सरकारने घोषित केले आहे. त्यानुसार, ग्रामीण भागात ६.९६ टक्के, प्रभाव क्षेत्रात ३.९० टक्के, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या क्षेत्रात ३.६२ टक्के, मुंबई वगळून महापालिका क्षेत्रात ८.८० टक्के, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात २.३४ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. राज्याची सरासरी दरवाढ ही मुंबई वगळून ५ टक्के एवढी आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमधील रेडिरेकनर दरवाढ अशी