मुंबई – देशात पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून हेरगिरीचे प्रकरण उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने कर्मचार्यांसाठी नवे फर्मान काढले आहेत. राज्य सरकारने काढलेल्या आदेशामुळे कार्यालयीन कामकाजावर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्य सरकारने काढलेल्या आदेशासनुसार, कार्यालयात काम करताना खूपच गरज असेल तरच फोनचा वापर करावा. तसेच मोबाईल फोनचा कमी आणि लँडलाइनचा अधिक वापर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य सरकारने हे आदेश काढले आहेत.
पॅगेसस हेरगिरी तंत्रज्ञानाच्या आधारे देशातील राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शास्त्रज्ञ अशा ३०० व्यक्तींचे फोन हॅक केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सुरक्षेच्या उपाययोजना करत आहे. हा निर्णय त्याच उपाययोजनेचा भाग मानला जात आहे. तसेच कार्यालयात सोशल मीडियाचा अतिवापर होत असल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे.
काय आहेत आदेश
मोबाईल फोनऐवजी संपर्क साधण्यासाठी एसएमएस पाठविण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याशिवाय कार्यालयात काम करताना सोशल मीडियाचा वापर कमी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. खासगी फोन आल्यास कार्यालयाबाहेर जाऊन बोलावे, असेही आदेशात म्हटले आहे.