नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या हक्काची जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी २१ सप्टेंबर २०२२ रोजी राज्यव्यापी बाईक रॅली संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून काढण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिक येथून ही मोठ्या संख्येने महसूल विभाग, पाटबंधारे विभाग, जिल्हा कोषागार कार्यालय, तलाठी संघटना, जिल्हा परिषद, जिल्हा शिक्षक संघटना, आरटीआय विभाग, जिल्हा शासकीय रूग्णालय, जिल्हा चतुर्थ श्रेणीचे सर्व विभाग कर्मचारी प्रचंड उत्साहात बाईक रॅलीत सामील झाले.
सकाळी ११ वा. गोल्फ क्लब मैदानावरून बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली. गोल्फ क्लब मैदानापासून जिल्हा परिषद मार्गे शालिमार, एम. जी रोड येथून सी.बी.एस.येथील शिवाजी स्मारकाजवळ बाईक रॅलीची सांगता करून मा. निवासी उपजिल्हाधिकारी, नाशिक यांना निवेदन आले. प्रचंड जोषात, उत्स्फूर्त घोषणाबाजीने नाशिकचा मध्यवर्ती भाग बाईक रॅलीने दणाणून निघाला होता. नाशिक जिल्हा राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ यांनी बाईक रॅली ला दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल सर्व संघटना, सर्व विभागांचे आभार व्यक्त केले. या रॅलीचे नियोजन शामसुंदर जोशी, जिजा गवळी, गोविंदा लहामगे, अर्चना देवरे, लता परदेशी, मनोज आहिरे, डी.जी.सुर्यवंशी, जगदीश घोडके, जितेंद्र पालवे, प्रशांत रौदंळ, मिलींद जगताप, अरूण आहेर, राजेंद्र अहिरे, तुषार नागरे, शशीकांत मोरे, सचिन सुर्यवंशी, तिदमे नाशिक जिल्हा राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व संघटना पदाधिकारी यांनी केले होते.