मुंबई – मराठा आरक्षणाबाबत आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रमुख मागणी मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. त्यांनी ही माहिती व्टिट करत दिली.
सोमवारी नाशिक येथे संभाजीराजे यांनी मूक मोर्चा काढून त्यानंतर समन्वयकांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी मूक मोर्चा महिनाभरासाठी स्थगित करण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी सरकार सकारात्मक असल्याचेही सांगितले होते. त्यानंतर ते मुंबईत रवाना झाले. आज ही याचिका दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.
https://twitter.com/YuvrajSambhaji/status/1407284206460342278?s=20