नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारच्या कारभाराविरोधात बिल्डर्स असोसिएश ऑफ इंडिया (बीएआय)ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तब्बल ९ हजार कोटींची विविध शासकीय कामांची देयके महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहेत. त्याविरोधात आता बीएआयने येत्या सोमवारी, (२४ एप्रिल) राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आम्ही बिल्डर्स असोशियन ऑफ इंडीयाचे (बीएआय) सभासद असून करोना काळापासून आम्हा ठेकेदारांचे सुमारे 9000 कोटींची विविध शासकीय कामांची देयके महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहेत. ती त्वरित अदा करावी या मागणीसाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे येत्या सोमवार, दिनांक २४/४/२०२३ रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष विजय बाविस्कर, सचिव प्रशांत सोनजे मा. अध्यक्ष अभय चोकसी व राहूल सुर्यवंशी, उपाध्यक्ष मनोज खांडेकर यांनी दिली.
ते म्हणाले की अनेक महिन्यापासून थकीत बिले मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधिक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. तसे निवेदन वेळोवेळी देण्यात आले आहे. परंतु त्यानंतर देखील थकीत बिले अदा करण्याबाबत काहीच ठोस कार्यवाही झालेली नही. मागील थकीत रक्कम सुमारे 9000 कोटींची असून देखील शासनाने नव्याने १५०००कोटींच्या कामाच्या निविदा काढलेल्या आहेत.
२/३ वर्षापासून देयके न मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व ठेकेदार कर्जबाजारी झालेले आहेत. यामुळे नाइलाजाने आम्ही सर्व ठेकेदार दिनांक २४ एप्रिल २०२३,सोमवारी सकाळी ११ते २या काळात राज्यभरात बिल्डर्स असोसिएशनतर्फे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालयात हे आंदोलन करीत आहोत.
संघटनेच्या ३ प्रमुख मागण्या अशा
१) मार्च २०२३पर्यंतची सर्व ठेकेदारांची थकीत रक्कम पूर्णतः अदा करावी.
२) मार्च २०२३ पर्यंतची बिले अदा झाल्यानतंरच पुढील बिले अदा करावीत .
३) निधी नसेल तर निविदा काढण्यात येऊ नयेत.
State Government Contractor Aggressive Threat Agitation