मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारकडून जिल्हा परिषद शाळांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला असून, येत्या काळात जिल्हा परिषद शाळांमध्येही ज्युनिअर आणि सिनिअर केजीचे वर्ग सुरु होणार केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांकडे आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे.
जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या खालवली आहे. विद्यार्थ्यांअभावी अनेक जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचीदेखील वेळ आली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषद शाळांमध्ये ज्युनिअर आणि सिनिअर केजीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या माध्यमातून गावागावातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांबाबतही महत्वाचा निर्णय एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठीदेखील गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात लवकरच विविध विभागांमध्ये एमपीएससीमार्फत भरती केली जाणार आहे. राज्यभरात सरळसेवेच्या माध्यमातून जवळपास ७५ हजार जागांवर भरती केली जाणार आहे. ही सर्व पदे टीसीएस आणि आयबीपीएस कंपन्यांमार्फत भरली जाणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, रोजगारातदेखील वाढ होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा दिलासादायक निर्णय आहे.
State Government Big Decision for Zilha Parishad School