बुधवार, सप्टेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बिबट्याच्या हल्ल्यात मृतकच्या वारसांना १० लाखांचा धनादेश सुपूर्द…

by Gautam Sancheti
ऑगस्ट 10, 2025 | 7:46 pm
in स्थानिक बातम्या
0
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवगाव येथील घटना अतिशय दुर्दैवी असून, बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी ट्रॅप व पिंजरे लावण्यात आले असून, RRT पथक सतत गस्त घालत आहे. शेतकरी व वनमजूर यांनी शेतात जाताना एकटे न जाता समूहाने जावे, गुरेढोरे बंदिस्त ठेवावीत आणि विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

मृतकाच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, एकूण २५ लाखांच्या आर्थिक मदतीपैकी आज 10 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला असून, उर्वरित १५ लाख रुपयांचा धनादेश लवकरच देण्यात येईल. प्रशासन व वन विभागाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

घटनेची पार्श्वभूमी
दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजता महरूण परिमंडळातील मौजे देवगाव फुकणी येथे शेतात कपाशी पिकाची निंदणी करत असताना वन्यप्राण्याच्या हल्ल्यात ७३ वर्षीय इंदुबाई वसंत पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांचे शेत (गट क्र. ५५) गिरणा नदीलगत असून, वनपरिक्षेत्र एरंडोल व राजवड यांच्या सीमेजवळ आहे. हल्ल्यानंतर शेतकऱ्यांनी तत्काळ प्रतिसाद देऊन वन्यप्राणी हुसकावून लावला. पोलिस पाटील यांनी वन विभागाला कळवून घटनास्थळी वनक्षेत्राधिकारी, कर्मचारी, RRT पथक आणि पोलिस विभागाने धाव घेऊन पंचनामा केला.

घटनेनंतर त्या परिसरात ट्रॅप कॅमेरे व पिंजरे बसवण्यात आले. दुसऱ्याच दिवशी फुकणी गावाजवळ बिबट्याने गायीवर हल्ला केल्याची घटना घडली असून, त्यावरही तातडीने कारवाई करण्यात आली आहे.

वारसांना पालकमंत्री यांच्या धनादेश सुपूर्द
शासन नियमांनुसार एकूण २५ लाख सानुग्रह अनुदानापैकी मृतकाच्या वारसांना आज १० लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी नितीन बोरकर, नायब तहसीलदार राहुल वाघ, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, डॉ. कमलाकर पाटील, दूध संघाचे संचालक रमेश आप्पा पाटील, शेतकी संघाचे विजय पाटील, दिपक सोनवणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, सरपंच जितु पाटील, किशोर पाटील, समाधान सपकाळे, योगेश पाटील, दिलीप आगिवाल, गोपाल जिभाऊ, मुरलीधर अण्णा पाटील, प्रमोद सोनवणे, बाला शेठ राठी, गजानन सोनवणे, वनपाल उमाकांत कोळी, वनरक्षक भरत पवार, अजय रायसिंग, रहीम तडवी, हरेश थोरात, विलास पाटील, राहुल पाटील, गोकुळ सपकाळे, पोलिस पाटील रमेश पाटील तसेच ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनपरिक्षेत्राधिकारी नितीन बोरकर यांनी केले. सूत्रसंचालन माजी सरपंच डॉ. कमलाकर पाटील यांनी केले, तर आभार पोलिस पाटील रमेश पाटील यांनी मानले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयाला युजीसीकडून स्वायत्त दर्जा…नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिले महाविद्यालय

Next Post

या व्यक्तींचे आर्थिक नियोजन काही प्रमाणात ढासळेल, जाणून घ्या, सोमवार, ११ ऑगस्टचे राशिभविष्य

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

rain1
संमिश्र वार्ता

राज्यात या भागात आजपासून पुढील पाच दिवस मध्यम पावसाची शक्यता

सप्टेंबर 3, 2025
IMG 20250903 WA0339
महत्त्वाच्या बातम्या

रिलायन्स जिओला ९ वर्ष पूर्ण…५० कोटी ग्राहकांना दिली ही खास सेलिब्रेशन प्लॅनची भेट

सप्टेंबर 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या, गुरुवार, ४ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 3, 2025
jalaj sharama
स्थानिक बातम्या

पावसाळा संपताच कुंभमेळ्याची विकास कामे सुरू होणार…नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा

सप्टेंबर 3, 2025
notice
मुख्य बातमी

महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना बजावली नोटीस…हे आहे कारण

सप्टेंबर 3, 2025
Chandrashekhar Bawankule
महत्त्वाच्या बातम्या

आता ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती

सप्टेंबर 3, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

या मार्गावर सुरू होणार रेल्वे…असा असेल रेल्वे मार्ग

सप्टेंबर 3, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडींमध्ये सव्वा चार लाख रूपयाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 3, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे आर्थिक नियोजन काही प्रमाणात ढासळेल, जाणून घ्या, सोमवार, ११ ऑगस्टचे राशिभविष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011