अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे अहमदनगर ते औरंगाबाद रोडवर सापळा रचत गोवा राज्य निर्मित व विक्री करीता असलेली व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित मद्यसाठा टाटा मोटर्स कंपनीची सहा चाकी वाहनासह जप्त करण्याची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. वाहनाचा चालक युवराज शिवाजी नाळे याची प्राथमिक चौकशी करून अटक करण्यात आली असून 8 लक्ष 28 हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा व वाहन जप्त करण्यात आले आहे.
कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त व्ही.एन.सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण विभागीय उपायुक्त मोहन वर्दे अधीक्षक,गणेश द. पाटील, उपअधीक्षक, राज्य उत्पादन सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे करण्यात आली असून या कारवाईत निरीक्षक ए.बी. बनकर, दुय्यम निरीक्षक, डी.आर.ठोकळ, आर. पी. दांगट, एस.बी. विधाटे, सहायक दुय्यम निरीक्षक टी.बी. करंजुले सहायक एन. एस. उके ,डी. आर. कदरे ए. के. सय्यद जवान, श्रीमती एस. आर. आठरे, ए. ए. कांबळे, निलेश बुरा, डी. आर. बर्डे यांनी सहभाग नोंदवला.
State Excise Department 8 Lakh Illegal Liquor Seized