मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांसदर्भात आज महत्त्वाचे आदेश काढले आहेत. नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, बृहन्मुंबई, ठाणे या महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना तयार करण्याबाबत आयोगाने या सर्व महापालिकांच्या आयुक्तांना आदेश काढले आहेत. त्यानुसार अंतिम प्रभाग रचनेचे कामकाज येत्या ११ मे पर्यंत पूर्ण करावे. १२ मे रोजी प्रभाग रचना निवडणूक आयोगास सादर करावी. त्यानंतर १७ मे रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
आयोगाने काढलेले आदेश असे