मुंबई – इयत्ता १२वीच्या निकालातील महत्त्वाचा टप्पा आज जाहिर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर (बैठक क्रमांक) देण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थी ऑनलाईनरित्या हा रोल नंबर बघू शकतात. या रोल नंबरच्या आधारेच विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. अद्याप निकाल जाहिर झालेला नाही. मात्र, रोल नंबरची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. येत्या काही दिवसातच निकाल जाहिर करण्यात येईल, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आला आहे. कोरोना संसर्गामुळे यंदा इयत्ता १२वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचा रोल नंबर देण्यात आला नव्हता. तो आता उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
असा बघा रोल नंबर
विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम खालील वेबसाईटवर क्लिक करावे
http://mh-hsc.ac.in/
वेबसाईटवर समोरच तुम्हाला काही पर्याय दिसतील. त्यात सर्वप्रथम जिल्हा आणि तालुका निवडावा लागेल. त्यानंतर आडनाव, वडिलांचे नाव द्यायचे आहे. त्यानंतर सर्च या बटणावर क्लिक करावे. त्वरित तुम्हाला तुमचा रोल नंबर दिसेल. हा रोल नंबर तुम्ही लिहून ठेवा. जेव्हा निकाल जाहिर होईल तेव्हा या रोल नंबरच्या आधारेच तुम्हाला निकाल बघता येईल.