नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील साकोरा गावात अज्ञात चोरट्यांनी स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राच्या दरवाजाचे कडी – कोयंडा कटरने तोडून अवघ्या २० मिनिटात १ लाख २० रुपयांची रोकड लंपास केली तर दोन दुचाकी चोरून नेल्या. चोरीचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला.