विशेष प्रतिनिधी, मुंबई
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी खुषखबर आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात असलेल्या शाखांमध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. अॅप्रेंटिसशिपद्वारे तब्बल ६ हजार १०० जागा भरल्या जाणार आहेत.
स्टेट बँकेत अॅप्रेंटिसशिपसाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेला ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी sbi.co.in. या वेबसाईटला भेट द्यावी. अर्ज करण्याची प्रक्रिया ६ जुलैपासून सुरू झाली आहे. येत्या २६ जुलै पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अपरेंटिस रिक्त पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्था कडून कोणत्याही शाखेत पदवी पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच ३१ ऑक्टोबर रोजी उमेदवारांचे वय २० वर्षांपेक्षा कमी आणि २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, एसबीआयने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत शिथिल करण्याची तरतूदही केली आहे, अधिक माहितीसाठी भरती अधिसूचनेचा संदर्भ घ्यावा.
निवड प्रक्रिया आणि स्टायपेंड
ऑनलाईन लेखी परीक्षा व स्थानिक भाषा परीक्षेच्या आधारे एसबीआयमध्ये अॅप्रेंटिससाठी उमेदवारांची निवड केली जाईल. ऑनलाईन लेखी परीक्षेमध्ये सर्वसाधारण आणि आर्थिक जागरूकता, सामान्य इंग्रजी, परिमाणात्मक दृष्टीकोन आणि तर्कसंगत क्षमता आणि संगणक योग्यता या विषयांचे एकूण १०० प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी १ तास असेल आणि एकूण विहित गुण १०० आहेत. लेखी परीक्षेत नकारात्मक चिन्हांकन देखील आहे. लेखी परीक्षेत यशस्वी घोषित झालेल्या उमेदवारांना स्थानिक भाषा चाचणीसाठी बोलवले जाईल. यात निवडलेल्या उमेदवारांना महिन्याला १५ हजार रुपये प्राथमिक वेतन दिले जाईल.