पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या काळात WhatsApp चा वापर करत नसतील अशा फारच कमी व्यक्ती असतील. अनेक कामांसाठी आजकाल व्हॉट्सअॅपचा वापर केला जातो. काही बँका याद्वारे बँकिंगच्या सेवाही पुरवतात. यादरम्यान आता देशातील मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील (State Bank Of India) व्हॉट्सअॅप बँकिंगची सुविधा सुरू केली आहे. तुम्ही चॅटद्वारे बँक बॅलन्स, मिनी स्टेटमेंटसह अनेक बँकिंग सुविधांचा लाभ याद्वारे घेऊ शकता.
एसबीआयने ग्राहकांसाठी आणखी एक फिचर आणले आहे. त्यामुळे ग्राहकांना काही सेंकदांत त्यांच्या खात्याचा तपशील तपासता येईल. तसेच खात्यातील शिल्लकी ही पाहता येईल. त्यासाठी ग्राहकांना एसएमएस करण्याची गरज नाही. वा मोबाईल अॅपवर जाऊन अथवा इंटरनेट बँकिंग वा एटीएम सेंटरवर जाण्याची गरज नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपच्या सहकार्याने ग्राहकांसाठी ही नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे.
अनेक बँकांनी हे नवे फिचर ग्राहकांसाठी आणले आहे. त्यात सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेनेही पुढाकार घेतला आहे. ग्राहकांना अनेक सुविधा देण्यासाठी बँके अग्रेसर आहे. खासगी बँकांनी सुरु केलेले हे फिचर आता स्टेट बँक ऑफ इंडियाने ही सुरु केले आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांचे व्हाट्सअप चाळता चाळता बँकेतील शिल्लकी अथवा खात्याचा तपशील व्हॉट्सअप फिचरच्या सहायाने बघता येतील.
एसबीआयच्या व्हॉट्सअॅप बँकिंग सेवेचा लाभ बचत खातेधारक आणि क्रेडिट कार्डधारक घेऊ शकतात. ही सुविधा सुरू करण्यासाठी खातेदारांना एसबीआयकडे नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीनंतर बँकेचे ग्राहक त्यांच्या खात्यातील बॅलन्स तपासू शकतील. तसेच बचत खात्याचे मिनी स्टेटमेंट पाहू शकतील. त्याचबरोबर क्रेडिट कार्डधारक या सेवेचा वापर करून खात्याचा तपशील आणि खर्चाचा तपशील बघू शकतील.
एसबीआय क्रेडिट कार्डधारक व्हॉट्सअॅप बँकिंग सेवांसाठी नोंदणी करू शकतो. कार्ड धारकाला त्याच्या व्हॉट्सअॅपवरून 9004022022 नंबरवर OPTIN टाइप करून पाठवावे लागेल. याशिवाय ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 08080945040 मिस्ड कॉल देऊ शकतात. तसेच त्याला मोबाइल अॅपच्या माध्यमातून या फीचरवर साइन अप करता येईल.
बँकेत रजिस्टर्ड मोबाईल क्रमांवरुन फोनमधील मॅसेज ऑप्शन ओपन करा. मेसेजमध्ये WAREG टाइप करा आणि स्पेस देऊन तुमचा खाते क्रमांक टाका. आता हा मेसेज 7208933148 क्रमांकावर एसएमएस करा. सेवा वापरण्यासाठी, आपण या नंबर Hi असं उत्तर देणे आवश्यक आहे. असे करताच तुमच्या व्हॉट्सअॅपवरचा सर्व्हिस मेन्यू ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला 90226 902226 हा व्हॉट्सअॅप मेसेज नंबर मिळेल. याचा अर्थ तुमची नोंदणी झाली आहे. आता मेन्यूमध्ये हवी ती माहिती निवडा, तसेच सेवेबद्दल माहिती ही विचारू शकता.
State Bank Of India WhatsApp Banking Facility Procedure