मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्राप्त कर्जाची रक्कम अवैधरित्या फिरवणे, बंद पडलेल्या कंपन्यांना मालाची विक्री केल्याचे दाखवणे आणि कंपनीच्या ताळेबंदात बनावट नोंदी आदि प्रकरणी धातू व खनिज क्षेत्रातील अशदेव कंपनीने स्टेट बँकेसह अन्य चार बँकांची १४३८ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. एखाद्या छोट्या कर्जदाराने हप्त चुकवल्यास तात्काळ कर चुकविल्यास सरकारी किंवा खाजगी बँक त्याच्यावर तात्काळ कारवाई करते परंतु काही वेळा मोठमोठे उद्योजक मात्र बँकेची प्रचंड प्रमाणात खोट्यावधी रुपयांची फसवणूक करतात कालांतराने हा घोटाळा उघडकीस येतो अशीच घटना मुंबई शहरात घडली आहे
अशदेव या कंपनीने स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांकडून कर्ज घेतले होते. परंतु, १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीमध्ये कंपनीच्या ताळेबंदात आणि आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता दिसून आली.
आता या प्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाचे उप-सरव्यवस्थापक सनातन मिश्रा यांनी सीबीआयकडे लेखी पत्राद्वारे ९ डिसेंबर २०२० रोजी तक्रार दाखल केली होती. या पत्राच्या आधारे सीबीआयने आता गुन्हा दाखल केला आहे. यानुसार, अशदेव कंपनीचे संचालक सुमन गुप्ता आणि प्रतीक गुप्ता यांनी स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील चार बँकांकडून कर्ज घेतले होते. परंतु आर्थिक गैरव्यवहार दिसून आला.
प्राप्त कर्जापैकी २१६ कोटी रुपयांची रक्कम कंपनीने दुसऱ्या कंपन्यांकडे वळविली होती. मूळ कर्जाच्या हेतूच्या विपरित असे हे हस्तांतरण होते. तसेच, कंपनीने परदेशातील तीन बंद पडलेल्या कंपन्यांकडेही कोट्यवधींची विक्री केल्याचे दाखवले होते. या प्रकरणी कर्जाची परतफेड खुंटल्याने बँकांनी कंपनीच्या साऱ्या व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट केले होते.
या व्यवहाराद्वारे या कंपनीकडून बँकांची तब्बल १४३८ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक झाली असून खरे म्हणजे ही रक्कम केवळ मुद्दलाची आहे, त्यामुळे हा आकडा वाढू शकतो असा दावा बँकांनी केला आले. त्यानंतर स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी अन्य बँकांच्या सहमतीने या प्रकरणी सीबीआयकडे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
State Bank of India SBI 1438 crore fraud other banks fraud