मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकर भरती सुरू होणार असून नोकरी मिळवण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लगेच अर्ज करावा स्टेट बँक ऑफ इंडियाने चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर एनीटाइम चॅनल, चॅनल मॅनेजर सुपरवायझर एनीटाइम चॅनल आणि सपोर्ट ऑफिसर या पदांसाठी अर्ज मागविले आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर एनीटाइम चॅनल, चॅनल मॅनेजर सुपरवायझर एनीटाइम चॅनल आणि सपोर्ट ऑफिसर-एनीटाइम चॅनल (SBI रिक्रूटमेंट 2022) या पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया बुधवार, दि. 18 मे पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जून 2022 आहे. तर, इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांवर अर्ज करण्यासाठी एकूण 641 पदे रिक्त आहेत.
– ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 18 मे 2022
– ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 जून 2022
– एकूण पदांसाठीच्या रिक्त जागा : चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर एनीटाइम चॅनल (CMF-AC) : 503
– चॅनल व्यवस्थापक पर्यवेक्षक (CMS-AC) : 130
– सपोर्ट ऑफिसर- (SO-AC) : 8
मिळेल एवढा पगार
चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर एनीटाईम चॅनल (CMF-AC) : 36,000 रुपये प्रति महिना
चॅनल मॅनेजर पर्यवेक्षक एनीटाइम चॅनल (सीएमएस-एसी) : 41,000 रुपये प्रति महिना
सपोर्ट ऑफिसर – एनीटाइम चॅनेल (SO-AC) : 41,000 रुपये प्रति महिना
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 60 वर्ष असावे.
– निवड प्रक्रिया :
या पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखत आणि गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.