मुंबई – सध्याच्या काळात तरूणांना बँकिंग क्षेत्रात नोकरीची चांगली संधी आहे. भारतीय स्टेट बँकेने आपल्या अधिकृत वेबसाइटवर विशेषज्ञ अधिकारी पदासाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एसबीआय मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
उमेदवार या 606 पदांसाठी दि. 18 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. तसेच भरती प्रक्रियेबद्दल अधिक तपशील sbi.co.in वेबसाइटला भेट देऊ शकतात. बँकेत व्यवस्थापक, उपव्यवस्थापक पदांसाठी नोंदणी प्रक्रिया खुली आहे. ज्या उमेदवारांनी एमबीए किंवा पीजीडीबीएम किंवा मार्केटिंग किंवा फायनान्समधील इतर कोणत्याही समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केला आहे ते यासाठी अर्ज करू शकतात.
तसेच, व्यवस्थापक पदासाठी, 1 जुलै 2021 रोजी उमेदवारांचे वय किमान 40 वर्षे असावे. उपव्यवस्थापक पदासाठी उमेदवार 1 जुलै 2021 रोजी किमान 35 वर्षांचे असावेत. या साठी एमए, एमएससी उमेदवार अर्ज करू शकतात. तर कार्यकारी पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमए किंवा एमएससी किंवा इतर कोणतीही समकक्ष पदवी उत्तीर्ण केलेली असावी. 1ऑक्टोबर 2021 रोजी उमेदवारांचे वय किमान 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
SBI बँक भरती 2021 तारखा अशा आहेत. अर्ज प्रक्रिया 28 सप्टेंबर 2021 पासून कधी सुरू होईल, या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 आहे, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 नोव्हेंबर 2021 आहे. तसेच रिलेशनशिप मॅनेजर, कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह या सारख्या इतर पदांसाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त कॉलेज किंवा विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय उमेदवारांना कामाचा अनुभवही असावा.
विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी पात्र होण्यासाठी, उमेदवार 1 ऑगस्ट 2021 रोजी 23 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन पात्रतेनुसार कोणत्याही पदासाठी अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांना संबंधित पदावर क्लिक करावे लागेल ज्यासाठी त्यांना अर्ज करायचा आहे आणि आवश्यक तपशीलांसह अर्ज भरावा. अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची एक प्रत त्यांच्याकडेच ठेवावी.