विशेष प्रतिनिधी, मुंबई
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) येत्या १ जुलैपासून मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा ग्राहकांवर थेट परिणाम होणार आहे. येत्या १ जुलै २०२१ पासून बचत खातेधारकांसाठी, नवे सेवा शुल्क लागू करण्याचा निर्णय बँकेने जाहिर केला आहे.
बँकेचे हे नवे दर एटीएममधून पैसे काढणे, चेकबुक घेणे, ट्रान्सफर यावर लागू होणार आहेत. एटीएम मधून एका महिन्यात केवळ चार वेळा मोफत व्यवहार करता येईल. ही मर्यादा संपल्यानंतर, त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर ग्राहकांना १५ रुपये आणि जीएसटी असे शुल्क द्यावे लागणार आहे. तर चार मोफत व्यवहारानंतर सर्वच एटीएम आणि शाखेतून केलेल्या व्यवहारावर, शुल्क आकारले जाणार आहे, असं स्टेट बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, स्टेट बँकेने हे शुल्क वाढविल्यानंतर आता अन्य बँकाही अशाच प्रकारे शुल्क वाढविण्याची शक्यता आहे.