मुंबई – देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI ) या बँकेने ई-लिलाव जाहीर केला आहे. या अंतर्गत मालमत्तेचा (प्रॉपर्टी) ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत लिलाव केला जाईल. या लिलावात आपण देखील बोली लावू शकता. याद्वारे तुम्हाला स्वस्तात उत्तम मालमत्ता मिळू शकते. याद्वारे तुमचे स्वतःच्या मालमत्तेचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
एसबीआयच्या अटी आणि शर्तींवर बोली यशस्वी झाल्यास मालमत्ता संबंधित ग्राहकाच्या सुपूर्द केली जाईल. सदर मालमत्ता ही निवासी घर किंवा व्यावसायिक मालमत्ता असू शकते. परंतु ही मालमत्ता बँक डिफॉल्टरच्या मालकीची आहे. कारण, असे अनेक वैयक्तिक कर्जदार किंवा खासगी कंपन्या बॅंकेकडून प्रॉपर्टीसाठी कर्ज घेतात परंतु ते वेळेवर परत करू शकत नाहीत. बँक अशा व्यक्ती किंवा कंपन्यांची मालमत्ता बँक ताब्यात घेते. तसेच ही मालमत्ता विकून बँक आपली थकबाकी वसूल करते. यासाठी बँकेकडून परवडणाऱ्या किमतीत मालमत्ता खरेदी करण्याची ऑफर दिली जाते.
एसबीआयच्या या लिलाव प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता राखली जाते. बोली लावण्यापूर्वी, मालमत्ता फ्री होल्ड किंवा लीज होल्ड आहे की नाही हे देखील इच्छुक ग्राहकाला सांगितले जाते. मालमत्तेचे क्षेत्र, स्थान इत्यादींची माहिती देखील बँकेने ई-लिलावापूर्वी दिली आहे. एसबीआयचा ई-लिलाव दि. 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. बँकेने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या ई-लिलावामध्ये अर्ज करण्याची लिंक देखील दिली आहे. आपण या लिंकला भेट देऊन मालमत्तेचे तपशील तपासू शकता. तसेच बँकेत अर्ज देखील करू शकता.
https://twitter.com/TheOfficialSBI/status/1448242583579156485?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1448242583579156485%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fd-14506651953337619126.ampproject.net%2F2109272305001%2Fframe.html