इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भविष्यात आपल्याला पैशाची गरज पडेल यासाठी बहुतांश नागरिक बँकेमध्ये बचत करत असतात, त्यामुळे बँकेच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येतो. त्यातच मुदत ठेव योजना म्हणजे फिक्स डिपॉझिट ही एक योजना चांगली आहे. विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडियाने गुंतवणूकदार तथा ग्राहकांसाठी चांगली योजना आणली आहे या योजनेचा सर्वांना लाभ घेत आहे येतो. मुदत ठेव योजना मध्येच सोडता येत नाही. मात्र तसे केल्यास तुम्हाला दंड भरावा लागतो. परंतू एसबीआयच्या विशेष मुदत ठेव योजनेतून तुम्हाला रक्कम काढता येते. विशेष म्हणजे त्यासाठी तुम्हाला एक रुपयाही दंड द्यावा लागत नाही.
एसबीआयच्या या मुदत ठेव योजनेचे नाव मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीम अथवा एसबीआई मोड्स (SBI MODS) असे आहे. ही योजना एक टर्म डिपॉझिट योजना आहे. ही योजना ग्राहकाच्या बचत अथवा चालू खात्याशी जोडल्या जाते. त्यामुळे या योजनेचा ग्राहकाला चांगला लाभ होऊ शकतो. एसबीआय मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीममध्ये ग्राहकांना सर्वसामान्य मुदत ठेव योजनेवर जे व्याज मिळते, त्यानुसारच व्याज दिल्या जाते. समजा, नेहमीच्या मुदत ठेवीवर ५.५ टक्के व्याज देण्यात येत असेल तर मल्टी डिपॉझिट योजनेतही ५.५ टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के जास्तीचे व्याज दिल्या जाते.
SBI च्या मल्टी ऑप्शन डिपॉझिटस्कीमचा कालावधी १ ते ५ वर्षांचा असतो. या योजनेत पूर्ण रक्कमही काढता येते. खात्यातून रक्कम काढण्यासाठी कुठलीही मर्यादा नाही. ग्राहकाला थेट खात्यातून, धनादेशाद्वारे किंवा एटीएमद्वारे ही रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच या मुदत ठेवीसाठी बचत खाते अथवा चालू खात्यात कमीतकमी, सरासरी शिल्लक ठेवावी लागणार आहे. ऑटो स्वीप सुविधेसाठी या खात्यात ३५ हजार रुपये बॅलन्स असणे गरजेचे आहे. या योजनेत १० हजार रुपयांपासून सुरुवात करता येते. तसेच यात जास्त कितीही रक्कम ठेवता येते.
या मुदत ठेव योजनेत ग्राहकाला कधीही रक्कम काढता येते. त्याने कालावधी पूर्ण होण्याअगोदर रक्कम काढल्यास ग्राहकाला कोणताही दंड द्यावा लागत नाही. या योजनेतंर्गत कोणीही खाते उघडू शकते. सिंगल अथवा ज्वाईंट, लहान मुलांच्या नावे, संयुक्त हिंदू परिवार, संस्था, कंपनी, सरकारी विभागाही त्यांच्या नावे या योजनेत खाते उघडता येऊ शकते.
State Bank of India Deposit Scheme Withdrawal