मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – सध्या वेगवेगळ्या कंपन्यांकडून मोबाईल फोन बाबत आकर्षक ऑफर देण्यात येत आहे. त्यातच आता आगळीवेगळी ऑफरची संधी मोबाईल वापरकर्त्या ग्राहकांना मिळणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मोबाईल वापरकर्त्यांसाठी OnePlus कडून एक उत्तम ऑफर दिली जात आहे.
SBI वापरकर्त्यांना OnePlus 9 5G स्मार्टफोन 5000 रुपयांच्या सवलतीत खरेदी करण्याची संधी दिली जात आहे. कृपया लक्षात घ्या की ही मर्यादित कालावधीची ऑफर आहे. 5 एप्रिल 2022 ते 5 मे 2022 दरम्यान ग्राहक या ऑफरचा आनंद घेऊ शकतात. हा फोन Amazon India वरून खरेदी करता येईल.
OnePlus 9 5G स्मार्टफोनच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 40,599 रुपये आहे. पण डिस्काउंटनंतर तुम्ही OnePlus 9 5G स्मार्टफोन 35,599 रुपयांना खरेदी करू शकाल. 12 GB रॅम 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 45,599 रुपये आहे, जी डिस्काउंटनंतर 40,599 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.
फोनच्या खरेदीवर 14,550 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. हा फोन 2,147 रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी केला जाऊ शकतो.…
OnePlus 9 5G स्मार्टफोनमध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच, प्रोसेसर सपोर्ट म्हणून क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट सपोर्ट उपलब्ध असेल. पॉवर बॅकअपसाठी, फोनला 4500mAh बॅटरी मिळेल, जी 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.
OnePlus 9 5G मध्ये 6.55-इंचाचा Fluid AMOLED डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक सेन्सर 48 मेगापिक्सेलचा आहे.
50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. तिसरा 2-मेगापिक्सेल मोनोक्रोम लेन्स आहे. फोनच्या पुढील बाजूस 16-मेगापिक्सलचा सेन्सर आहे. फोनमध्ये 4500 mAh ची बॅटरी आहे जी 65W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन अँड्रॉइड ११वर कार्य करतो.