नवी दिल्ली – भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. योनो (YONO) अॅपसह इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून करण्यात आलेले पाच लाखांपर्यंतच्या इनोव्हेटिव्ह रिअल टाइम पेमेंट (आयएमपीएस) व्यवहारावर कोणतेच सेवा शुल्क लावले जाणार नाही, असे एसबीआयने म्हटले आहे. आयएमपीएसच्या माध्यमातून ग्राहक आता तत्काळ पाच लाखांचे पेमेंट करू शकणार आहेत. पूर्वी पेमेंट करण्याची २ लाखांची मर्यादा होती.
जर तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन आयएमपीएस केले, तर त्यावर जीएसटीसह सेवा शुल्क द्यावे लागू शकते, ही माहिती एसबीआयने ट्विटरवर दिली. त्यानुसार, बँकेच्या शाखांमध्ये होणारे आयएमपीएस व्यवहारासाठी २ लाखावरून पाच लाख रुपयांचा नवा स्लॅब तयार करण्यात आला आहे. या स्लॅबअंतर्गत येणार्या रकमेवर वीस रुपये सेवा शुल्क+जीएसटी द्यावा लागणार आहे. हे निर्देश १ फेब्रुवारी २०२२ पासून लागू होणार आहेत.
https://twitter.com/TheOfficialSBI/status/1478394595675459589?s=20
डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन
एसबीआयच्या माहितीनुसार, डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून एयएमपीएस व्यवहारावर सेवा शुल्क लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा व्यवहार योनो अॅप, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून करता येऊ शकतो. आयएमपीएसच्या अंतर्गत एक हजारापर्यंतच्या व्यवहारावर कोणतेही सेवा शुल्क नाही. १००१ ते १० हजार रुपयांपर्यंत दोन रुपये आणि जीएसटी शुल्क लागू होईल. १० हजार रुपये ते १ लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर ४ रुपये आणि जीएसटी शुल्क लागू होईल. १ लाखांवर वरील दोन लाख रुपयांपर्यंत १२ रुपये आणि जीएसटी शुल्क लागू होईल. हे शुल्क फक्त बँकेच्या कोणत्याही शाखांमधून करण्यात आलेल्या व्यवहारांवर लागू होते.