मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने आपल्या ग्राहकांसाठी एक आवश्यक सूचना प्रसिद्ध केली आहे. ग्राहकांनी आपले पॅन Permanent Account Number) आधार कार्डशी (Aadhar-PAN linking) लिंक करण्याच्या सूचना बँकेने केल्या आहेत. असे न केल्यास ग्राहकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पॅन आणि आधार क्रमांक लिंक करण्याची मुदत यापूर्वीच तीन वेळा वाढविण्यात आली आहे. आता पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२२ ठविण्यात आली आहे.
बँक म्हणते…
एसबीआयने आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करून माहिती दिली, आम्ही आमच्या ग्राहकांना सल्ला देत आहोत की, कोणतीही असुविधा होऊ नये यासाठी आपला पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक करावा आणि विनानिर्बंध बँकिंग सेवेचा आनंद घ्यावा. पॅनला आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. जर ग्राहक लिंक करू शकले नाही, तर पॅन बंद होईल. त्यामुळे स्पेसिफाइड ट्रँझॅक्शनसाठी त्याचा वापर केला जाऊ शकणार नाही.
https://twitter.com/TheOfficialSBI/status/1482348036038995972?s=20
पॅनला आधारशी लिंक असे करा
ग्राहक सोप्या पद्धतीने ५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर एसएमएस पाठवून दोन्ही लिंक करू शकतात. पॅनला आधार क्रमांकाला जोडण्यासाठी ग्राहकांनी UIDPAN 0000011112222 AAAPA7777Q वरील क्रमांकावर एसएमएस पाठविल्यानंतर आधार क्रमांक पॅन क्रमांकाशी जोडला जाईल. यासाठी तुमचे नाव आणि जन्म तारीख दोन्ही कागदपत्रांमध्ये समान असेल तरच हे होऊ शकते.