बुधवार, ऑगस्ट 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

१५ लाखांची वर्कऑर्डर मिळणार असल्याने स्टार्टअपचा प्रचंड प्रतिसाद

by Gautam Sancheti
जून 27, 2021 | 3:46 pm
in राज्य
0
navab malik2 680x375 1

विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाला चांगला प्रतिसाद मिळाला असून देशभरातील १ हजार ८४६ स्टार्टअप्सनी या सप्ताहासाठी नोंदणी केली आहे. आरोग्यविषयक ३२०, शेतीविषयक २५२, शिक्षणविषयक २३८ अशा विविध क्षेत्रातील नवसंकल्पना सादर झाल्या असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
तरुणांमधील नवसंकल्पनांना प्रोत्साहन देणे, देशातील उद्योजकीय परिसंस्थेला चालना देणे हा या सप्ताह आयोजनामागील उद्देश असून सप्ताहातील उत्कृष्ट स्टार्टअप्सना राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये त्यांच्या नवसंकल्पनांचा लाभ देण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांच्या कामांचे कार्यादेश देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाच्या या चौथ्या आवृत्तीसाठी 12 मे 2021 पासून www.msins.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये कृषी, शिक्षण व कौशल्य, शासन, आरोग्य सेवा, स्मार्ट पायाभूत सुविधा, गतिशीलता, स्वच्छ ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात देशभरातील स्टार्टअप्सनी अर्ज केले आहेत. २७ राज्य व केंद्रशासित प्रदेशांकडून १ हजार ८४६ अर्ज प्राप्त झाले असून महाराष्ट्रातून सर्वाधिक ९४७ अर्ज प्राप्त झाले आहेत. आता या अर्जांची तज्ञांकडून तपासणी केली जाईल आणि जुलै 2021 च्या शेवटच्या आठवड्यात टॉप 100 स्टार्टअपची यादी जाहीर केली जाईल. टॉप 100 स्टार्टअप्सना 9 ते 13 ऑगस्ट, 2021 दरम्यान गुंतवणूकदार, तज्ज्ञ आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी यांच्यासमोर सादरीकरण करण्याची संधी मिळेल. कोरोना साथीमुळे सर्व सादरीकरण सत्रे ही ऑनलाईन पद्धतीने होतील. यातील विजयी 24 स्टार्टअप्सना त्यांच्या नवसंकल्पना शासनाच्या संबंधीत विभागात वापरण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी १५ लाख रुपयांच्या कामांचे आदेश देण्यात येतील, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.
यंदाच्या स्टार्टअप सप्ताहामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक ९४७ स्टार्टअप्सनी सहभाग घेतला आहे. त्यानंतर कर्नाटक २०२, दिल्ली ८७, गुजरात ५४, केरळ ६४, मध्य प्रदेश ३४, तामिळनाडू ८९, तेलंगणा ५६, उत्तरप्रदेश ७५, राजस्थान ३७, हरयाणा ३२  याप्रमाणे विविध २७ राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशातील एकूण १ हजार ८४६ स्टार्टअप्सनी सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक ३२२ अर्ज पुण्यातून आले आहेत. तर मुंबई २१२, मुंबई उपनगर ७०, औरंगाबाद १९, कोल्हापूर १३, नागपूर ४२, नाशिक ५२, पालघर १३, रायगड २३, ठाणे ९७ याप्रमाणे विविध जिल्ह्यांमधून अर्ज प्राप्त झाले आहेत.
आरोग्यविषयक ३२०, कृषिविषयक २५२, शिक्षणविषयक २३८, गव्हर्नन्सविषयक ७२, कौशल्यविषयक ९४, स्मार्ट पायाभूत सुविधाविषयक १७६,  परिवहनविषयक १२६, शाश्वत हरित ऊर्जाविषयक ५८, घनकचरा व्यवस्थापनविषयक ११०, पाणी व्यवस्थापनाबाबत ५१ तर इतर विविध विषयांबाबत ३४९ याप्रमाणे नवसंकल्पना सादर करणाऱ्या स्टार्टअप्सनी या सप्ताहासाठी अर्ज केला आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून तरुणांच्या नवसंकल्पनांना मोठ्या प्रमाणात चालना आणि प्रोत्साहन देण्यात येईल, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगाव तालुक्यातील कामकाजावरुन दादा भुसे संतप्त; अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Next Post

निफाड – माजी आमदार अनिल कदम यांच्या प्रयत्नाने २४ गावांचा जलजीवन मिशन आराखड्यात समावेश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

भूमित्र या चॅटबॉट सेवेचे उद्घाटन 3
संमिश्र वार्ता

महसूल विभागाने ‘महाभूमी’ संकेतस्थळावर ‘भूमित्र’ या चॅटबॉट सेवेची केली सुरुवात

ऑगस्ट 27, 2025
Milind Kadam M4B
संमिश्र वार्ता

मुंबई येथून रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी प्रवासी जलवाहतूक सेवा…इतक्या तासाचा असेल प्रवास

ऑगस्ट 27, 2025
Sadan Ganesh 1 11 913x420 1
महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाचा जल्लोष; आज ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा

ऑगस्ट 27, 2025
ajit pawar e1706197298508 1024x770 1
महत्त्वाच्या बातम्या

लंडनमधील ‘महाराष्ट्र भवन’ साठी ५ कोटींचा निधी….उपमुख्यमंत्री अजित पवार

ऑगस्ट 27, 2025
ganeshotsav 1 e1738348574343
मुख्य बातमी

यंदा बाप्पा वाजत गाजत येणार… अशी करा श्रीगणेशाची स्थापना… असा आहे मुहूर्त…

ऑगस्ट 27, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना जुने मित्र भेटेल, जाणून घ्या, बुधवार, २७ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 26, 2025
IMG 20250826 WA0402
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्हा परिषद विकास निर्देशांकात राज्यात प्रथम…मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गौरव

ऑगस्ट 26, 2025
Untitled 44
संमिश्र वार्ता

३० महिला शेतकऱ्यांनी उच्च दर्जाची हिरवी मिरची पिकवून तब्बल ४० मेट्रिक टन उत्पादनची दुबईला केली निर्यात

ऑगस्ट 26, 2025
Next Post
IMG 20210627 WA0312 1 e1624810330609

निफाड - माजी आमदार अनिल कदम यांच्या प्रयत्नाने २४ गावांचा जलजीवन मिशन आराखड्यात समावेश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011