मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या काही मालिका खूपच गाजत आहेत त्यातच टीव्हीवरील म्हणजेच छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले. सुनील बर्वे, किशोरी अंबिये, कोमल कुंभार, नंदिता पाटकर या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
आता या मालिकेत एक नवा चेहरा पाहायला मिळणार आहे. ती म्हणजे अभिनेत्री पूजा पुरंदरे होय, आता ती स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत एन्ट्री करणार आहे. याबाबत पूजाने खुद्द ही माहिती दिली आहे. पूजाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. पूजानं सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या सेटवर हजेरी लावून शुटींगलाही सुरुवात केली आहे. सेटवरचा एक फोटोही तिने पोस्ट केला आहे.
अभिनेत्री पूजा पुरंदरे हिचा जन्म दि. 23 डिसेंबर रोजी पुण्यात झाला आहे. तिने आपले शालेय शिक्षण पुण्यातील पी.जोग हायस्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने सिंहगड कॉलेज मधून बी. कॉमची पदवी प्राप्त केली आहे. पूजाच्या वडिलांचे नाव अजित पुरंदरे असून आईचे नाव नंदिनी पुरंदरे असे आहे. अभिनेत्री पूजा पुरंदरे हिने आपल्या अभिनयाची सुरुवात नाटकांपासून केली आहे. नाटक करत असताना तिला टीव्ही वरील जाहिरातीसाठी विचारण्यात आले. ती जाहिरात केल्यानंतर आपण अभिनय क्षेत्रातच आपले करियर सुरू केले.
अभिनेत्री पूजा पुरंदरे हिने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेपूर्वी सुंदर माझ घर या मालिकेत गायत्रीची नकारात्मक भूमिका साकारली होती. त्याशिवाय किती सांगायचे मला या मालिकेत उर्मीची आणि नकुशी या मालिकेत मृण्मयीची भूमिका साकारली आहे. आता पूजा या मालिकेत नेमकी काय भूमिका साकारतेय, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण पूजा पुरंदरे याआधी कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लोकप्रिय मालिकेत दिसली होती.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत तिने ‘कामिनी’ची ही भूमिका साकारली होती.‘कामिनी’ची निगेटीव्ह भूमिका तिने अतिशय उत्तमरित्या साकारली होती. दौलतरावबरोबर पूजाची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. पूजाने आता ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतुन ब्रेक घेतला असून आता ती ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतील तिचा लुक पाहून चाहते क्रेझी झाले आहेत.
Star Pravah Marathi TV Serial Sahkutumba Sahparivar New twist