इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वात केवळ कलाकारांवरच प्रेक्षकांच्या चाहत्यांचे लक्ष नसते तर त्यांच्या कुटुंबीयांकडे तसेच मुलांकडेही चाहत्यांचे लक्ष असते. त्यामुळेच हे स्टारकिड्स लहानपणापासूनच फार चर्चेत असतात. परिणामी, अनेकदा वेगळे वागणे हे स्टारकिड्स यांना भारी पडते. नुकतेच शाहरुख खान याच्या मुलाबाबतीत घडलेले प्रकरण सर्वांनी पाहिले आहे. सोशल मीडियाचा जमाना असल्याने नेटकरी कुणालाच सोडत नाहीत. अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा ही नुकतीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. तिच्या वागण्याबद्दल नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केली आहे.
अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगण फिल्मी दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वीच चर्चेत आली आहे. विविध पार्ट्या, कार्यक्रमांमध्ये न्यासा हजेरी लावत असते. पण, तिच्या उपस्थितीपेक्षाही तिचे कपडे नेहमीच चर्चेत असतात. बॉलीवूडकरांचे कपडे कसे असतात, याची आपल्याला कल्पना आहेच. त्यातही तिचे कपडे अत्यंत वाईट म्हणण्यापेक्षा भलतेच बोल्ड असतात. यामुळेच बऱ्याचदा तिला तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे ट्रोल केलं जातं. न्यासाच्या २०२२ च्या ख्रिसमस आणि न्यू इयर पार्टीमधील बोल्ड लूकने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. यावेळी तिचे आणि बिझनेसमनचा मुलगा ओरहान अवत्रमणीबरोबरचे मिठी मारून काढलेले फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. तिच्या या बोल्ड अंदाजमुळे ती खूप ट्रोल झाली होती.
तिच्या या ग्लॅमरस लूकनंतर काही दिवसांपूर्वी ती काजोलबरोबर पंजाबी ड्रेस घालून सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी आली होती. तेव्हा ती एकदम संस्कारी लूकमध्ये दिसली. यानंतर, नुकतीच न्यास वडिलांसोबत विमानतळावर दिसली. यावेळी तिने गुलाबी फुल स्लीव्ह टॉप आणि जीन्स परिधान केली होती. न्यासाचा बदललेला लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मित्रासोबत असताना ग्लॅमरस लूक आणि आई-वडिलांबरोबर असताना अंगभर कपडे असा न्यासाचा बदलणारा लूक पाहून लोक मात्र चकित झाले आहेत.
अजय देवगणबरोबरचा तिचा विमानतळावरचा व्हिडीओ पाहून लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. या व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा ती ट्रोल होत आहे. एक नेटकरी म्हणाला, “आई-बाबांबरोबर असताना न्यासा खूप साधी असते आणि ओरीबरोबर असताना तिचे रंग बदलतात. तर दुसरा म्हणाला, “मेकअप नसेल तर ती अजिबात ओळखूही येत नाही.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “पालकांसोबत असताना हिचे कपडे व्यवस्थित असतात. तेव्हा ती संस्कारी असल्याचे दाखवते. पण, त्यांच्यासोबत नसताना मात्र तिचे तेवर वेगळेच असतात. नेटकऱ्यांनी तिला यावरून चांगलेच ट्रोल केले आहे. तिचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.
Star Kid Nyasa Devgan Troll in Social Media