रविवार, नोव्हेंबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नोटरीसाठी तुम्ही किती पैसे देता? नोटरी खरी आहे की खोटी कशी ओळखायची?

जानेवारी 9, 2023 | 2:37 pm
in इतर
0
Stamp Notary

इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जागो ग्राहक जागो –
नोटरी डॉक्युमेंट आणि फसवणूक

 ग्राहक राजा आपण नोटरी डॉक्युमेंट करणेसाठी जाता तेव्हा किती फी देता? त्याची पावती घेता का? नोटरी बोगस तर नाही ना? अनेक कायदेशीर आणि अन्य कामांसाठी नोटरी करणे अगत्याचे ठरते. आणि हेच नोटरी करताना बहुतांशवेळा फसवणूक होते. ती कशी असते आणि ही फसवणूक होऊ नये म्हणून काय करायला हवे, हे जाणून घेऊ..

IMG 20220513 WA0011
विजय सागर
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
(अखिल भारतीय ग्राहक पंचायत) मो. 9422502315

नोटरीची नियुक्ती ही सरकार करते जेणे करून नागरिकांना लहान सहान करार मदार करणे साठी, साक्षांकित प्रती करणे साठी सोईस्कर होईल. नागरिकांचा तसेच सरकारी नोंदणी अधिकारी यांचा वेळ वाचेल.

नोटरी कायदा 1952 आणि नोटरी नियम 1956 मधील कलम / नियम विचारात घेऊन दस्तऐवज साक्षांकित करणे, नियम 10 नुसार फी आकारणे हे अपेक्षित आहे. परंतु काही नोटरी हे अवाजवी फी आकारात आसतात त्यामुळे शासनाने परिपत्रके काढून फी निश्चित केलेली आहे. सदर बाबत आपण खालील लिंक द्वारे दर पाहू शकता, विविध नोटरी संबंधित परिपत्रके पाहू शकता.
https://lj.maharashtra.gov.in/1253/Notary-Circulars
नोटरी अधिनियम १९५२ मधील कलम ३ नुसार व नोटरी नियम १९५६ नुसार नोटरीची नियुक्ती करण्यात येते.

नोटरीच्या नियुक्तीसाठी वकीली व्यवसायाचा १० वर्षांचा अनुभव लागतो. (महीला, मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय साठी किमान ७ वर्षांचा अनुभव लागतो ) नोटरीची एकदा नियुक्ती झाल्यावर दर ५ वर्षांनी नोटरीना मुदतवाढ देण्यात येते त्यासाठी नोटरी ने दर पाच वर्षांनी आपले सर्टिफिकेट रीन्यू केले पाहिजे.
नोटरीची नियुक्ती झाल्या नंतर शासन त्यांना कोणतेही मानधन देत नाही. परंतु ते शासनाने निश्चित केलेली फी नागरिकांकडून घेऊ शकतात.

सामान्य जनतेला एखाद्या नोटरीच्या विरुध्द कारवाई/ तक्रार करायची असल्यास नोटरी अधीनियम 1956 मधील नियम 13 नुसार सक्षम प्राधीकारी यांच्याकडे रीतसर तक्रार करु शकता.
नोटरी विरुध्द कारवाई करावयाचे अधिकार
सहसचिव तथा सक्षम प्राधीकारी,
विधी आणि न्याय विभाग, रूम नंबर 304 (मुख्य), 3 रा मजला, राजगुरू हुतात्मा चौक, मादाम कामा रोड, मांत्रालय, मुंबई– 32. दूरध्वनी क्रमाांक.(022) 22028619
यांना आहेत. तेव्हा आपण त्यांच्याकडे रीतसर तक्रार करू शकता.

नोटरी फी ही खालील प्रमाणे अकारावी असे परिपत्रक क्रमांक विवन्यावि-2012/नोटरी/ई-शाखा दिनांक १३/०४/२०१२ नुसार निश्चित केले आहे.
१)रुपये १०००० पर्यंतचा करार नोंदवायचे(नोटरी करणेसाठी) साठी रुपये ३५
२)दहा हजार ते २५००० साठी रुपये ७५/-
३) २५००० ते ५०००० साठी रुपये १००/-
४) ५०००० चे पुढे जास्तीत जास्त रुपये १५०/-
५) साक्षांकित प्रती साठी रुपये ५/- प्रती पान (कमीतकमी रुपये १०/-)
वरील लिंकने आपण सर्व चार्जेस बाबत माहिती घेऊ शकता.
वरील प्रमाणे रुपये ३५/- ते रुपये १५०/- म्हणजेच जास्तीत जास्त रुपये १५०/- एवढाच आकार नोटरी घेऊ शकतात.

कित्येक नोटरी हे काही हाई कोर्टात, सुप्रीम कोर्टात दाखल करायचे कागद पत्रे, काही करार नामे यांच्या साठी वरील पेक्षा खूप जास्त फी मागतात आणि नागरिकांना याची माहिती नसते त्यामुळे तेही नविलाजने देतात.
आपणास माहीत आहे का नोटरी ने अकारलेल्या फिची पावती द्यावी असेही शासनाने बंधन नोटरी वर घातले आहे.
आपण ज्या नोटरीची सर्व्हिस घेत आहात त्या नोटरी चे सर्टिफिकेट ची मुदत संपलेली नाही ना याची नक्की खात्री करा, शिवाय सदर नोटरी हे खरे आहेत की बोगस आहेत याची माहिती घ्या .

आपण सदर लिंक द्वारे चेक करू शकता की शासनाने नियुक्त केलेले सदर नोटरी आहेत.
जर नोटरी बोगस आहे, सर्टिफिकेटची मुदत संपलेली आहे तर आपण त्यांची तक्रार वरील पत्यावर जरूर करा आणि आपल्या बरोबर इतर ग्राहकांना, नागरिकांना फसवणुकीपासून वाचवा.
नोटरी ने त्यांना मंजूर केलेल्या कार्यक्षेत्रात काम करावे असेही शासनाने नमूद केले आहे. जर त्यांनी त्यांच्या कर्यक्षेत्राबाहेर काम केले तर शासनाकडे तक्रार केल्यावर त्यांचे वर कायदेशीर कारवाई होते आणि त्यांचे सर्टिफिकेट ही काढून घेतले जाऊ शकते.
तेव्हा ग्राहकांनी सजग बनले पाहिजे. सरकार सरकार म्हणजे कोण? जनता हीच सरकारची मालक आहे. बिनधास्त पुढे या, सोशल मीडिया चा वापर करा आणि लिहायला, तक्रार लेखी, ईमेल ने द्यायला शिका तरच देश बदलेल.
हे असेच चालायचे आपला देशाची व्यवस्था खूप भ्रष्ट झाली आहे असे रडगाणे गाण्या पेक्षा आपण ती सुधारूयात. चला व्यवस्था बदलू यात.

आपणास काहीही मार्गदर्शन हवे असेल तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतशी अवश्य संपर्क करावा.
आमची वेबसाईट : www.abgpindia.com
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०
अधिक माहितीसाठी संपर्क
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188

श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286, श्री दिपक सावंत 9833398012
*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 9975712153
*नागपूर*: श्री विलास ठोसर 9766550868
*परभणी*’: डॉक्टर विलास मोरे 8180052500
Stamp Notary Fees Fake True Jago Grahak Jago by Vijay Sagar
Cheating Consumer

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या रेल्वे मार्गावर १० ते २४ जानेवारी दरम्यान मेगा ब्लॉक; सहा गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलले

Next Post

तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीवरील त्रिकुटाने केला लंपास

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीवरील त्रिकुटाने केला लंपास

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011