इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी घोषणा केली असून त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. राज्यातील शासकीय कार्यालयात दाखल कराव्या लागणा-या प्रतिज्ञापत्राबाबत हा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता ५०० रुपयाचा स्टॅम्प घेण्याची गरज राहणार नाही. साध्या कागदावर अटेस्टेड अर्ज लिहून प्रमाणापत्र आता तहसिल कार्यालयातून मिळू शकणार आहे.
दहावी बारावीच्या निकालानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांना विविध प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ३ हजाराहून अधिक खर्च येत असतो. तो या निर्णयामुळे वाचणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॅान क्रीमी लेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यासह विद्यार्थ्यांना अनेक प्रमाणपत्र घ्यावे लागतात. या सर्व प्रमाणपत्रासाठी ५०० रुपये मुद्रांक शुल्क जाते. त्या एेवजी आता एका साध्या कागदावर सेल्फ अटेस्टेड अर्ज लिहून हे प्रमाणपत्र तहसिल कार्यालयातून मिळवता येणार आहे.