नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य परिवहन महा मंडळ नाशिक विभागात २५ वर्षे विना अपघात सेवा करणाऱ्या ३२ बस चालकाचा सहपत्नी सत्कार प्रजासत्ताकदिनी करण्यात आला. प. विभागीय कार्यालय येथे हा समारंभ संपन्न झाला. यावेळी या बसचालकांना २५ हजार रुपयाचा धनादेश विना अपघात सेवा केल्या बद्दल देण्यात आला. तसेच २५ वर्ष विना अपघात सेवा केल्या बद्दलचा बिल्ला प्रमाणपत्र देण्यात आले. बसचालकांच्या पत्नीला यावेळी साडी खण देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास अरुण सिया विभाग नियंत्रक, सोमवंशी यंत्र अभियंता, कैलास पाटील विभागीय वाहतूक अधिकारी, दादाजी महाजन विभागीय वाहतूक अधीक्षक हे उपस्थित होते.