यवतमाळ – जिल्ह्यातील उमरखेड येथे एसटी बस पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे. ही बस नागपूरहून नांदेडकडे जात होती. गुलाब चक्रीवादळामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. परिणामी, अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. याचदरम्यान आज सकाळी ही एसटी बस उमरखेड तालुक्यातील दहेगाव या गावाजवळून जात होती. त्याचवेळी ही बस दहेगाव पुलावरुन जात होती. पाण्याचा वेग अधिक असल्याने ही बस थेट पुरातच वाहून गेली. बस ड्रायव्हरच्या नको त्या धाडसामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात जिल्हादिकारी अमोल येडगे यांनी सांगितले की, बसमध्ये एकूण ६ प्रासी होते. त्यातील दोन जणांना वाचविण्यात आले आहे. तर, एक जणाचा मृत्यू झाला आहे. अद्यापही शोधकार्य सुरू आहे. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/airnewsalerts/status/1442747651691323392