मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने एसटी महामंडळाच्या अस्तित्वापुढे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांची फिरण्याची सवय कमी झाली आहे. अडीअडचणीला दुचाकी, चारचाकी गाड्या उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत एसटी बस वाचून कुणाचे अडलेले नाही. संप जेवढा लांबेल तेवढी एसटीची गरज कमी होत जाईल. त्यामुळे सरकारशी वाटाघाटी करून संप मागे घेऊन प्रवासी वाहतूक सुरू करणे एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचे राहील. यासंदर्भात परखड विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. बघा हा व्हिडिओ