इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आषाढी पंढरपुर यात्रा आषाढ शु.सप्तमी २ जुलै ते ११ जुलै या कालावधीत भरणार असून यात्रेचा या मुख्य दिवस ६ जुलै आषाढी एकादशी आहे. तसेच गुरुपौर्णिमा १० जुलै रोजी आहे. आगाराच्या कक्षेत पंढरपुर येथे जाणारे व येणारे यात्रेकरुंची वाहतुक २ जुलै ते ११ जुलै पर्यंत करण्यात येणार आहे. तसेच सदर जादा वाहतुकीसाठी नाशिक विभागामार्फत ३०० बसेसेचे नियोजन करण्यात आलेले आहे. पंढरपूर येथे जाणा-या भाविक प्रवाशांकरीता खालील केंद्रावरुन जादा रा.प.बसेस पंढरपुर येथे पाठविण्यात येणार आहेत, त्या बस स्थानकांची नाव पुढील प्रमाणे आहेत. खालील बसस्थानकातुन पुरेशा प्रमाणात बस असल्याने थेट बस सेवा उपलब्ध करुण देण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.
