गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एसटीच्या अध्यक्षांनी शिवनेरी सुंदरीऐवजी समस्यांकडे लक्ष द्यावे कर्मचारी संघटनेची मागणी

by India Darpan
ऑक्टोबर 3, 2024 | 12:42 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20241002 WA0532 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एसटीचे कर्मचारी हे ब्रँड ॲम्बेसेडर व सुंदरी पेक्षा चांगली सेवा प्रवाशांना देत असून शिवनेरी सुंदरीची भुरळ सोडून नवीन अध्यक्षांनी एसटी कर्मचारी व प्रवाशांच्या समस्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या ३०४ व्या सभेत महामंडळाचे नवीन अध्यक्ष भरत गोगावले यांनी शिवनेरी सुंदरीची नेमणूक करण्याची घोषणा केली असून ती परिस्थितीला अनुसरून नाही. आजही कर्मचारी व प्रवाशांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्याकडे लक्ष देणे गरजेचे असून तसे केल्यास उत्पन्न वाढ होऊन प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा देता येतील, असे बरगे यांनी म्हटले आहे.

शिवनेरी बसची सेवा ही एसटी महामंडळातील अत्यंत चांगली व फायदेशीर सेवा आहे. साधारण १२० इलेक्ट्रिक व डिझेल वरील बस या सेवेत आहेत. एसटीच्या वेगवेगळ्या सेवांच्या तुलनेत या सेवेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून या सेवेचे सरासरी भारमान हे ८० टक्के इतके आहे. या सेवेत अजून गाड्या वाढविण्याची गरज असून त्याची व्याप्ती निव्वळ पुणे, मुंबई, ठाणे, या पुरती मर्यादित ठेवता राज्यभर वाढवली पाहिजे. आजही मागणीच्या तुलनेत सर्वच सेवेतील गाड्या कमी पडत असून त्यात प्रवाशांना अजून सेवा सुविधा दिल्या पाहिजेत.
एसटी कर्मचारी व अधिकारी अत्यंत हे चांगले काम करीत असून जुन्या झालेल्या गाड्या घेऊन त्यांनी महामंडळ नफ्याच्या जवळ पोहोचविले आहे.

ब्रँड ॲम्बेसेडर व शिवनेरी सुंदरीवर खर्च करण्यापेक्षा वाढीव वेतनाचा फरक, महागाई भत्त्याची थकबाकी व वार्षिक वेतनवाढ प्रलंबित थकबाकी द्यावी. त्या मुळे कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्य वाढून उत्पन्न वाढेल व ते ब्रँड ॲम्बेसेडर व शिवनेरी सुंदरी पेक्षा प्रवाशांना चांगल्या प्रकारे सेवा देतील यात शंका नाही, असेही बरगे यांनी म्हटले आहे. विमान सेवा ही सलग सेवा असून तिला शक्यतो थांबे नसतात. त्या मुळे त्यांना खान पान देण्यासाठी हवाई सुंदरीची गरज असते. एसटीची कुठलीही सेवा ही थांब्याशिवाय नसून शिवनेरीच्या पुणे, मुंबई या सेवेत सुद्धा गाड्या चहा पाण्यासाठी थांबत असतात. त्यामुळे या गैरलागू योजनेचा फेरविचार करावा अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

दरम्यान,शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी या निर्णयाचा बचाव करताना म्हटले आहे की, “विरोधक विनाकारण या निर्णयावर टीका करत आहेत. आम्ही नवीन बसेसमध्ये गुंतवणूक करत आहोत आणि एसटी महामंडळात सुधारणा करत आहोत. महिलांना रोजगार मिळत असेल, तर काय नुकसान आहे? तर शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी या उपक्रमावर टीका करताना, एसटी बससेवेची विमानांशी तुलना करण्याऐवजी मूलभूत सेवा सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. बसेसच्या स्थितीकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी वेळेवर पोहोचायचे आहे, हॉटेल सारख्या सेवांचा अनुभव नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

फर्निचर व किचन ट्रॉली बनविणा-या एका व्यावसायीकाने ग्राहकाची अशी केली फसवणुक…गुन्हा दाखल

Next Post

राज्यात ४० हजाराहून अधिक रुग्णांना ३४० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत…विधानसभा अध्यक्षांनी केले कौतुक

India Darpan

Next Post
Screenshot 2024 10 02 230515

राज्यात ४० हजाराहून अधिक रुग्णांना ३४० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत…विधानसभा अध्यक्षांनी केले कौतुक

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011