बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार मंगळवारी होणार..!

by India Darpan
एप्रिल 14, 2025 | 6:43 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250414 WA0047 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्याचे फक्त ५६ टक्के वेतन मिळाले होते. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी होती. मेहनत करुन ही हक्काचा पगार मिळाला नाही. त्यामुळे महिन्याचं बजेट पूर्ण कोलमडलं. कुणाचे बँकेच हाफ्ते चुकले, तर कुणाची आर्थिक कोंडी झाली. इतर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत आणि पूर्ण होता. मग एसटी कर्मचाऱ्यांनी काय घोडं मारलं अशी प्रतिक्रीया उमटत होत्या. शेवटी सरकारने आता त्यावर तोडगा काढला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीन तोडगा काढण्यात आला आहे.

पूर्ण पगार न झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. गुरूवारी सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांची काही एसटी कर्मचाऱ्यांनी भेट घेतली. त्यांनी पगार झाला नाही ही बाब एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली. आपले उर्वरित वेतन लवकरच द्यावे, अशी मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल शिंदे यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे उर्वरित ४४ टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येईल असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांवरिल वेतन कपातीचे संकट दूर होण्यास मदत झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित ४४ टक्के पगार येत्या मंगळवार पर्यंत देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी केलेल्या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन लवकरच अदा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे.

राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळ तोट्यात असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे एसटीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण पडत आहे. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी. त्यामुळे महामंडळाला राज्य सरकारच्या मदतीवर अवलंबून राहावं लागत आहे. राज्य सरकार कडून मदत आल्यानंतरच पुढील प्रक्रिया होतात. अनेक वेळा पगार उशिरा होतात. तर कधी होतच नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना आर्थिक व्यवहारात थोड्या अडचणी, जाणून घ्या, सोमवार, १४ एप्रिलचे राशिभविष्य

Next Post

या जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपिट; केळी व मका पिकांचे मोठे नुकसान

Next Post
IMG 20250413 WA0291 e1744594706784

या जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपिट; केळी व मका पिकांचे मोठे नुकसान

ताज्या बातम्या

image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
mantralya mudra

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

जून 18, 2025
crime1

पेस्टीसाईड दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या औषधांवर मारला डल्ला

जून 18, 2025

कुंभमेळा प्राधिकरणाची पहिली बैठक संपन्न…अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्या या सूचना

जून 18, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

जून 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011