रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘एसटी’ च्या कर्मचाऱ्यांना आता मिळणार चार महिने मोफत पास…

by India Darpan
फेब्रुवारी 7, 2025 | 4:31 pm
in संमिश्र वार्ता
0
st bus


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -एसटी महामंडळाने त्यांच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांना विशेष भेट दिली आहे. त्यानुसार सेवेतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना २ महिन्याऐवजी ४ महिने, तर माजी कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या सहा महिन्याऐवजी नऊ महिने एसटी प्रवासाचा पास मोफत मिळणार आहे. ही सवलत साध्या बससाठीच असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मात्र नाराजी आहे.

चांद्यापासून बांध्यापर्यंत
सर्वसामान्य नागरिकांच्या सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून एसटीच्या प्रवासी वाहतुकीकडे बघितले जाते. एसटी महामंडळात सध्या सुमारे ८६ हजार अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. पती वा पत्नी, दोन मुले, आई-वडील, विधवा बहिणीला महामंडळाकडून प्रत्येक वर्षी दोनदा प्रत्येकी एक महिन्याची मोफत प्रवास पास मिळत होती. परंतु, कामगार संघटनांनी वर्षभर ही सवलत देण्याची मागणी केली. त्यासाठी बऱ्याचदा आंदोलनही केले.

दरम्यान,राज्य परिवहन संचालक मंडळाच्या १८ डिसेंबर २०२४ रोजीच्या बैठकीत कामगार करार २००७-२००८ मधील तरतुदीनुसार सेवेवरील कर्मचाऱ्यांना जानेवारी ते जून या पहिल्या सत्रात दोन महिने तर जुलै ते डिसेंबर या दुसऱ्या सत्रात दोन महिने अशी चार महिने मोफत प्रवास पास देण्यास मंजुरी देण्यात आली. त्याबाबतचा आदेश ४ फेब्रुवारी २०२५ रोजी निघाला. एसटीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पती वा पत्नीला वर्षातून विशिष्ट कालावधीसाठी पूर्वी सहा महिनेच मोफत पास मिळत होती. परंतु, आता ही पास नऊ महिन्यांसाठी मिळणार आहे.

राज्यात नुकतीच शिवाई ही ई-बससेवा सुरू झाली आहे. परंतु, या बसमध्ये पासधारकाला मोफत प्रवासाची मुभा नाही. शिवशाहीने जायचे असेल तर साधी बस आणि शिवशाही बसमधील प्रवास भाड्यातील तफावतीची रक्कम भरून प्रवास करता येतो. शिवाई बसमध्ये मात्र या पद्धतीनेही प्रवासाची मुभा नाही. सेवेवरील कर्मचाऱ्यांना ४ महिने तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ९ महिन्यांचीच पास मिळणार आहे. ही सवलत फक्त साध्या बससाठीच देणे चुकीचे आहे. वर्षभर कोणत्याही एसटी बसमध्ये प्रवासाची मुभा द्यायला हवी, असे मत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दुचाकीवर लिफ्ट देणे चालकास पडले महागात,बॅगेतील ५० हजाराची रोकड केली लंपास

Next Post

या विभागाच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया, ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

India Darpan

Next Post
Samajkalyan Office e1625912328817

या विभागाच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया, ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

ताज्या बातम्या

bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011