नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन ७ तारीख उलटून गेले तरी अद्याप झाले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
नवे सरकार आल्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची परिस्थितीत सुधारणा होईल, अशी एस टी कर्मचाऱ्यांना अपेक्षा होती. पण, नवे सरकार येऊनही अजून पगार झालेला नाही.
सरकारकडून आश्वासन देऊन पाळले जात नाही. एसटी परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला होता. त्यावेळी उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीच्या समितीची शिफराशीनुसार कारवाई होत नाही. या समितीने कर्मचाऱ्यांचे पगार ७ ते १० तारखेदरम्यान करण्यास सांगितले होते. परंतु अद्याप एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. यामुळे सर्व कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
घरखर्च, हफ्ता कसा भरायचा असा प्रश्न कर्मचाऱ्यांना सतावत आहे. दिवाळी ऍडव्हान्स ही जमा न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पगार वेळेवर होत नसल्यामुळे अनेक अडचणी त्यांच्या कुटुंबियांसमोर आहे. यामुळे पुन्हा एकदा कर्मचारी एसटी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आहे.