किरण घायदार, नाशिक
एस. टी. महामंडळाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या एस. टी. बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा दिली आहे. त्याचसोबत ६५ ते ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के तिकिटात सवलत दिली आहे; परंतु अनेकदा प्रवाशांकडे आधारशिवाय अन्य ओळखपत्र दाखवले जात असल्याने वाहक व प्रवाशांमध्ये वाद होत असतात. प्रवाशांच्या एस. टी. महामंडळाकडे आलेल्या तक्रारीवरून एस.टी. महामंडळाने हा निर्णय़ घेतला आहे.
हे ओळखपत्रही चालणार
आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, राज्य शासनाने सेवानिवृत्त अधिकारी- कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र, डिजी लॉकर, एम. आधार व एस. टी. महामंडळाने दिलेले स्मार्ट कार्ड हे ग्राह्य धरून तिकीट सवलत देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हे दिले आदेश
महाव्यवस्थापकांनी आधार कार्डसह तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र ग्राह्य धरून तिकिटात सवलत द्यावी, असे आदेश काढले आहेत. तिकीट काढण्यापूर्वी वयाच्या पडताळणीसाठी आधार कार्डसह अन्य ग्राह्य असलेले ओळखपत्र दाखवून प्रवाशांना ही सवलत देण्याचे आदेश होते; परंत वाहक व प्रवाशांमध्ये अन्य ओळखपत्र दाखवण्यावरून वाद होत असे. एस टी.च्या महाव्यस्थापकांनी ग्राह असलेल्या ओळखपत्रानुसार ज्येष्ठ नागरिकांना प्रवासभाड्यात सवलत द्यावी, असे कळविले आहे.