नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एसटीचा प्रवास महागणार असल्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाने १४.१३ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. हा प्रस्ताव भाडेवाढीशिवाय तीन वर्षांचा आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भाडेवाढीचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
एसटी महामंडाळाने ठेवलेल्या प्रस्तावानुसार, १४.१३ टक्के वाढ मंजूर झाल्यास प्रवाशांना सध्या १०० रुपयांच्या तिकिटावर १५ रुपये जादा मोजावे लागतील. सुरुवातीला परिवहन विभागाने १२.३६ टक्क्यांची किरकोळ वाढ सुचवली होती, मात्र नंतर महामंडळात झालेल्या चर्चेनंतर त्यात सुधारणा करून १४.१३ टक्के करण्यात आली.
दरम्यान, आता नवीन १४.१३ टक्के दरवाढ मंजूर करायची की अन्य पर्यायांचा विचार करायचा याबाबत नवीन सरकार निर्णय घेणार आहे. महामंडळाच्या या निर्णयाचा प्रवाशांवर मोठा परिणाम होणार आहे.