किरण घायदार, नाशिक
दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने दिवाळीच्या गर्दी हंगामात १० टक्के भाडेवाढ दोन दिवसापूर्वी जाहीर केली होती. ती आता रद्द करण्यात आली आहे. एसटी महामंडळाकडून दरवर्षी दिवाळीनिमित्त हंगामी भाडेवाढ केली जाते. घराकडे निघालेले चाकरमाने, विद्यार्थी तसेच सुटीच्या काळात पर्यटनासाठी निघालेल्या पर्यटकांना खिसा हलका करावा लागतो. पण, आता तो होणार नाही.
महसूल वाढीच्या दृष्टीने एसटीने दरवर्षीप्रमाणे परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ करत असते. यावेळेसही एसटी महामंडळाने दिवाळीच्या हंगामात सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात वाढ केली होती. परिवर्तन, शिवनेरी, शिवशाही आदि सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीटांमध्ये १० टक्के भाडेवाढ केली होती. पण, आता ती सर्व रद्द करण्यात आली आहे.
एसटीची भाडेवाढ २५ ऑक्टोंबर २०२४ ते २५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान दरम्यान लागू होणार होती. पण, ती रद्द करण्यात आली आहे.