किरण घायदार, नाशिक
रा प महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होणेसाठी चालक / वाहकांसाठी दिनांक २१/०९/२०२४ ते २०.१०.२०२४ या कालावधीत प्रायोगिक तत्वावर उत्पन्नावर आधारीत प्रोत्साहन भत्ता योजना राबविणेचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी सध्या आगारात चालविण्यात येणा-या कामगार कर्तव्यांसाठी उदिदष्ठ निश्चित करणेसाठी खालीलप्रमाणे कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.
१. कामगार कर्तव्याचे २१ सप्टेंबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीसाठी उद्दिष्ट निश्चित करताना प्रथम त्या कामगार कर्तव्यामधील प्रत्येक फेरीचा “मूळ आकडा ” निश्चित करावा. याकरिता प्रथम माहे सप्टेंबर २०२३ महिन्याचे सर्व दिवसांचे निव्वळ वाहतूक उत्पन्न (वाहकाने विक्री केलेल्या तिकीटांचे उत्पन्न) विचारात घेण्यात यावा. दिनांक ०१ ऑक्टोबर २०२४ ते २० ऑक्टोबर २०२४ या कालावधीसाठी उद्दिष्ट निश्चित करताना प्रथम त्या कामगार कर्तव्यामधील प्रत्येक फेरीचा “मूळ आकडा ” निश्चित करावा. याकरिता प्रथम माहे ऑक्टोबर २०२३ महिन्याचे सर्व दिवसांचे निव्वळ वाहतूक उत्पन्न (वाहकाने विक्री केलेल्या तिकीटांचे उत्पन्न) विचारात घेण्यात यावा.
२. संपूर्ण महिन्यात प्राप्त झालेल्या उत्पन्नाची उतरत्या कमाने मांडणी करुन उच्चतम प्रथम सात आकडे निश्चित करण्यात येतील व या सात आकडयांची सरासरी अंक हा त्या फेरीच्या उत्पन्नाचे उदिदष्ठ असेल. याप्रमाणे एका कामगार कर्तव्यात अंतर्भूत असलेल्या सर्व फे-यांच्या उदिदष्ठांची बेरीज करुन त्या कामगार कर्तव्याचे उदिदष्ठ निश्चित करण्यात येईल.
३. निश्चित करण्यात आलेल्या कामगार कर्तव्याची आगार लेखाकार व सहाय्यक वाहतूक अधिक्षक यांनी तपासणी करुन सदरची उद्दिष्टे प्रमाणीत करावीत,
४. विभागीय स्तरावर विभागीय वाहतूक अधिकारी, लेखा अधिकारी/विभागीय लेखा अधिकारी व विभागीय सांख्यिकी अधिकारी यांनी आगारामार्फत निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्ठांची तपासणी करावी.
५. जर एखादी फेरी मागील वर्षी चालनात नसल्यास नजीकच्या महिन्यातील त्या फेरीचे प्राप्त उत्पन्न विचारात घेऊन मुद्दा क्र. ०२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे उदिदष्ठ निश्चित करण्यात येईल. जर एखादे कामगार कर्तव्य प्रोत्साहन भत्ता योजना कालावधीत नव्याने सुरु करण्यात आले / येणार असेल व त्याचे उदिदष्ठ निश्चित करणेसाठी मागील वर्षीचे उत्पन्न अथवा नजीकच्या महिन्यातील उत्पन्न याचा तपशील उपलब्ध नसल्यास त्या कामगार कर्तव्यासाठी सदर फेरीचे ६०% भारमाना इतके उत्पन्न (विनासवलत) उदिदष्ठ म्हणून निश्चित करण्यात येईल.
६. चालक / वाहकांना देण्यात येणा-या प्रोत्साहन भत्त्याची रोकड व तिकीट विभागात स्वतंत्र नोंदवहीत नोंद ठेवण्यात यावी. व आगार लेखाकार यांनी त्याची दैनंदिन तपासणी करावी.
७. ज्या सेवांवर चालक / वाहक बदल देण्यात येतो, त्यांच्या बाबतीत प्रत्येक चालक वाहक जोडीने ज्या कि.मी. प्रवासाची कामगिरी केली असेल, ती कामगिरी विचारात घेऊन त्या जोडीसाठी वाहतूक उत्पन्नाचे उद्दिष्ठ निश्चित करण्यात यावे. ज्या सेवांमध्ये एकापेक्षा अधिक चालक / वाहक जोडीचा समावेश आहे, त्यांच्या बाबतीत प्रत्ये चालक / वाहक जोडीने स्वतंत्रपणे चालविण्यात आलेल्या सेवेच्या भागासाठी वर नमुद केल्याप्रमाणे स्वतंत्र उदिदष्ठ निश्चित करण्यात यावे.. बदली देण्यात येणा-या चालक/ वाहक जोडीस प्रोत्साहन भत्त्या देय होत असल्यास ती रक्कम चालक / वाहक ज्या जोडीने दिला आहे त्या आगाराकडून देय राहील.
८. जर एखादी सेवा विविध संख्येच्या चालक / वाहकांकडून चालविली जात असेल (१ चालक / २ वाहक किंवा २ चालक / १ वाहक किंवा २ चालक ३ वाहक तर संबंधित वाहकांना उद्दिष्ठापेक्षा अतिरिक्त मिळालेल्या उत्पन्नाच्या १०% रक्कम प्रत्येकी देय राहील, उर्वरित रक्कम चालकांना त्यांनी ज्या अंतरापर्यंत गाडी चालविली असेल त्या प्रमाणात विभागून देण्यात कामगार बदल देणा-या आगाराचा चालक ज्यावहेळी वाहक आपल्या आगारात प्रोत्साहन भत्ता 2 त्यावेळी सदर चालक उपस्थित नसल्यास अशा प्रकरणी ज्या आगाराने सेवा चालविली आहे त्या आगाराने वाहक व चालकाच्या प्रोत्साहन भत्त्याची देय रक्कम संबंधित आगारास अधिकृतपणे कळवावी.
९. कामगार कर्तव्याकरिता देण्यात आलेल्या उदिदष्ठांपेक्षा वाढीव उत्पन्नापैकी २०% रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देय राहील सदरची रक्कम संबंधित चालक / वाहकांस समप्रमाणात (प्रत्येकी १०%) कर्तव्य संपल्यानंतर आगारात हिशेब देतेवेळी रोखीने अदा करण्यात येईल.
१०. प्रोत्साहन भत्ता कालावधीत चालक / वाहकांविरुध्द प्रवाशांसमवेत गैरवर्तणुक केल्याचे तक्रार उद्भवल्यास व सदर तक्रारीसाठी ते जबाबदार असल्याचे सिध्द झाल्यास संबंधित चालक / वाहकांस प्रोत्साहन भत्ता देय रहाणार नाही. ११. नियत कामगार कर्तव्य करीत असताना अनुचित पध्दतीने उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केल्याचे
निदर्शनास आल्यास त्या चालक / वाहकांना सदर कामगिरीकरिता प्रोत्साहन भत्ता देय रहाणार नाही. १२. प्रोत्साहन भत्ता कालावधीत चालक / वाहकांनी सवलतधारी अथवा इतर प्रवाशांना बसमध्ये प्रवेश नाकारल्याचे आढळून आल्यास संबंधित चालक / वाहकांना त्या कामगार कर्तव्याकरिता प्रोत्साहन भत्ता देय रहाणार नाही.
१३. विनावाहक सेवांना तसेच भाडेतत्वावरील चालकांना सदरची प्रोत्साहन भत्ता योजना लागू रहाणार नाही.
१४. सदरची योजना २१ सप्टेंबर २०२४ ते २० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत प्रायोगीक तत्वावर राबविण्यात येत आहे.
१५. सदरचे परिपत्रक सर्व चालक / वाहक व पर्यवेक्षकीय कर्मचा-यांच्या निदर्शनास आणण्यात यावे.
१६. चालक / वाहकांना अदा करण्यात येणा-या प्रोत्साहन भत्त्याचे लेखांकनाबाबत लेखा खात्याकडून स्वतंत्रपणे सूचना प्रसारीत करण्यात येतील.