किरण घायदार, नाशिक
नाशिक – राज्यातील एस टी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सरकार मार्फत धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना लागु करण्यात आलेली आहे, यामुळे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. महामंडळ मार्फत 9/9/2024 रोजी एक GR निर्गमित करून माहिती देण्यात आलेली आहे.
रा.प. महामंडळातील अधिकारी / कर्मचारी आरोग्याच्या दृष्टीने जागृत राहावे या उद्देशाने रा.प. महामंडळात सेवेत असलेल्या ज्यांचे वय ४० वर्षे व त्यापेक्षा अधिक आहे त्या अधिकारी / कर्मचा-यांसाठी दर दोन आर्थिक वर्षातून एकदा धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना अंमलात आणणेबाबत संदर्भ क्र. ०१ च्या परिपत्रकान्वये सुचना देण्यात आलेल्या आहेत. दि.०१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या चालू आर्थिक वर्षात या योजनेची अंमलबजावणी परिपत्रकात दिलेल्या सुचनेप्रमाणे आपल्या स्तरावर तात्काळ कार्यवाही करणेबाबत सुचना आहेत.
या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी खालील दिलेल्या सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
१. विभागीय कार्यालयांकडून ४० वर्षावरील कर्मचा-यांची यादी या सोबत देण्यात येत आहे. या यादीतील प्रत्येक कर्मचा- यांचे वय ४० वर्षे व त्यापेक्षा अधिक आहे त्यांची वैद्यकिय तपासणी होणे आवश्यक आहे.
२. कर्मचा-यांने वैद्यकिय तपासणीसाठी जाण्यापुर्वी आगार प्रमुख । शाखा प्रमुख यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. आगार प्रशासनाने देखील दैनंदिन वाहतुक व दैनंदिन कामात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही ही बाब विचारात घेवून कर्मचा-यांना वैद्यकिय तपासणीसाठी परवानगी देण्यात यावी.
३. संदर्भित परिपत्रकात नमूद केलेल्या सर्व वैद्यकिय चाचण्या करणे संबंधित कर्मचा-यांस बंधनकारक राहील. अपुर्ण / कमी वैद्यकिय चाचणी केली असल्यास कोणतीही रक्कम प्रतिपुर्ती केली जाणार नाही ही बाब कर्मचा-यांच्या निदर्शनास आणून द्यावी. ४. धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजनेनुसार दि.०१.०४.२०२४ ते ३१.०३.२०२५ या कालावधीत आपल्या आगारातील ४० वर्षांवरील सर्व कर्मचा-यांची वैद्यकिय तपासणी विना सबब पुर्ण करावयाची आहे. या अनुषंगाने कमी गर्दीच्या हंगामात सदर तपासणी पूर्ण करुन घेण्यात यावी.
५. कर्मचारी यांच्याकडून प्राप्त झालेली वैद्यकिय चाचणी अहवाल व बिल हे या कार्यालयास पाठविण्यापुर्वी आपल्या आगार / घटकाचे मानसेवी वैद्यकिय अधिकारी यांना दाखविण्यात यावे व त्यावर सोबत जोडलेले विहीत नमुन्यातील पत्रावर मानसेवी वैद्यकिय अधिकारी यांचा अभिप्राय घेण्यात यावा. वैद्यकिय तपासणीची मुळ कागदपत्रे व बिले या कार्यालयास पाठविण्यात यावे, छायांकित प्रती स्विकारल्या जाणार नाहीत.
६. योजनेच्या अनुषंगाने लाभ घेण्यासाठी सोबत जोडलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित कर्मचारी यांचेकडून भरुन वैद्यकिय देयकासोबत पाठविणे आवश्यक आहे. ७. धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना या योजनेतील वैद्यकिय तपासणीबाबत सुसूत्रता आणण्यासाठी खालील विहीतनमुन्यातील नोंदवही आगार स्तरावर तयार करण्यात यावी व खालील विहीत नमुन्यात त्याचा मासिक अहवाल दरमहा ०५ तारखेपर्यंत विभागीय कार्यालयास पाठविण्यात यावा.
८. आपल्या आगारातील चालक, वाहक व प्रशासकीय कर्मचा-यांच्या संदर्भित परिपत्रकातील नमूद सर्व आरोग्य तपासण्या करुन घेण्यात याव्यात. तसेच सर्व यांत्रिक कर्मचा-यांची आरोग्य तपासणी प्राधिकृत प्रमाणक शल्यचिकित्सक यांचेमार्फत स्वतंत्ररित्या करण्यात येणार असल्याने त्यांचा यात समावेश केलेला नाही. त्याबाबत या कार्यालयामार्फत स्वतंत्र सुचना प्रसारीत करण्यात येतील.