विशेष प्रतिनिधी, मुंबई
इयत्ता दहावीच्या सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार संगणकीय प्रणालीद्वारे विद्यार्थी-निहाय गुणांची नोंद करताना काही शाळांकडून काही त्रुटी आणि चुका झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. ही बाब गंभीर असल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने त्याची तत्काळ दखल घेतली आहे. म्हणूनच मंडळाने शाळांना एक फर्मान पाठविले आहे.
ज्या शाळांना संगणक प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद करताना काही अडचणी आल्या असतील त्यांनी पाच ते नऊ जुलै दरम्यान संबंधित विभागीय मंडळांशी निश्चित केलेल्या नियोजनानुसार संपर्क साधावा असं आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहे.