विशेष प्रतिनिधी, पुणे
दहावी परीक्षा (एसएससी) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कोणतीही नोकरी मिळणे सोपे नसते. परंतु आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि दहावी पर्यंतच शिक्षण घेऊ शकणाऱ्या मुलांसाठी शासकीय खात्यात नोकरीची संधी उपलब्ध आहे. कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी) जीडी कॉन्स्टेबल भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यावेळी कॉन्स्टेबलची एकूण २५,२७१ पदे भरती करण्यात येणार आहेत.
एकूण भरती पदांपैकी पुरुष कॉन्स्टेबलची २२,४२४ आणि महिला कॉन्स्टेबलची २,८४७ पदे आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ssc.nic.in वर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे.
ऑनलाईन शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर असून चालानद्वारे फी जमा करण्याची अंतिम तारीख ७ सप्टेंबर आहे. याकरिता पात्रता
– दहावी उत्तीर्ण असून वयोमर्यादा १८ वर्षे ते २३ वर्षे आहे. १ ऑगस्ट २०२१ पासून वयाची गणना केली जाईल.
म्हणजेच, केवळ तेच उमेदवार अर्ज करू शकतात. ज्यांचा जन्म २ ऑगस्ट १९९८ आणि १ ऑगस्ट २००३ दरम्यान आहे. ते वयोमर्यादेने पात्र असून एससी, एसटी प्रवर्गात उच्च वयोमर्यादा पाच वर्ष आणि ओबीसीसाठी तीन वर्षांची सवलत मिळेल.
अमेदवार निवडीसाठी सर्वप्रथम तेथे लेखी परीक्षा (संगणक आधारित) असेल. यशस्वी उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीईटी) आणि शारीरिक मोजमाप चाचणी (पीएसटी) साठी बोलावण्यात येईल.
लेखी परीक्षेत जनरल इंटेलिजन्स अॅण्ड रीझनिंग, जनरल नॉलेज अँड जनरल अवेयरनेस, एलिमेंटरी मॅथ्स आणि इंग्लिश / हिंदी विषयांशी संबंधित प्रश्न विचारले जातील. चारही विभागांमधून २५-२५ प्रश्न विचारले जातील. सर्व विभाग प्रत्येकी २ गुणांचे असतील. या पेपरचा कालावधी ९० मिनिटांचा असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी चौथा गुण वजा केला जाईल. अंतिम गुणवत्तेच्या आधारे तरुणांची निवड केली जाईल.
एसएससी जीडी कॉन्स्टेबल परिक्षेसाठी महत्त्वाच्या तारखा :
– अर्ज प्रक्रियेची प्रारंभ तारीख – १७ जुलै
– ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – ३१ ऑगस्ट (११.३० वाजता)
– ऑनलाईन फी जमा करण्याची शेवटची तारीख – २ सप्टेंबर (रात्री ११.३०)
– ऑफलाइन चालान निर्मितीची अंतिम तारीख – ४ सप्टेंबर (रात्री ११.३०)
– चालानद्वारे फी जमा करण्याची अंतिम तारीख – ७ सप्टेंबर आहे.
मात्र श्रेणी १ ची (क्लास १) परिक्षा तारीख (सीबीटी) – नंतर माहिती दिली जाईल.
अनारक्षित उमेदवारांना १०० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. महिला फी आणि एससी व एसटी उमेदवारांना या फीमधून सूट देण्यात आली आहे. एसबीआय चालान व एसबीआय नेट बँकिंग किंवा मास्टरकार्ड, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे फी जमा केली जाऊ शकते. पात्र व इच्छुक उमेदवार ssconline.nic ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.