मुंबई – भारतीय टपाल विभागात सध्या नोकरीची मोठी संधी आहे. टपाल खाते हा सर्वसामान्य नागरिकांचा गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत जिव्हाळ्याचा विभाग राहिला आहे. टपाल खात्यातील नोकरी ही एक प्रकारे जनसंपर्काचे उत्तम माध्यम असते.
पश्चिम बंगालमध्ये ग्रामीण डाक सेवक पदासाठी विविध सर्कलमध्ये २,३५७ जागा रिक्त आहेत. या पदांवरील अधिसूचना २० जुलै रोजी सुरू झाल्या. १९ ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. मात्र आता अर्ज करण्याची तारीख २२ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार https://appost.in/gdsonline/home.aspx वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
१० वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता तयार केली जाईल. उमेदवाराची उच्च पात्रता असेल तरीही निवडीचा आधार फक्त १० वीचे गुण पत्रक असेल. या अंतर्गत ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्टमास्तर, सहाय्यक शाखा पोस्टमास्तर, डाक सेवक पदे भरली जातील.
वय श्रेणी किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असून वयोमर्यादा २७ जानेवारी २०२१ च्या आधारावर ठरवली जाईल. अनुसूचित जातीसाठी पाच वर्षे, ओबीसी प्रवर्गासाठी तीन वर्षे आणि अपंग वयोमर्यादेत अपंगांसाठी १० वर्षे सूट असेल. तसेच शैक्षणिक पात्रतामध्ये मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून दहावी उत्तीर्ण. गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजीमध्ये १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.