मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. पोस्ट विभागाने देशभरात बंपर भरती जारी केली आहे. पोस्ट विभागात नोकरी शोधणाऱ्या १०वी पास उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. शाखा पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ३ ऑगस्ट पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट आहे. यानंतर, २४ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या कालावधीत अर्जातील संपादन किंवा दुरुस्ती विंडो सक्रिय असेल.
पोस्ट ऑफिस भर्ती २०२३ ही आहेत पदे
अनारक्षित श्रेणी – १३६२८
ओबीसी – ६०५१
अनुसुचित जाती (SC) – ४१३८
अनुसुचित जमाती (ST) – २६६९
आर्थिक मागासवर्ग (EWS) – २८४७
PWD-A – १९५
PWD-B – २२०
PWB-C – २३३
PWD-DE – ७०
पोस्ट विभागाच्या या भरतीअंतर्गत एकूण ३० हजार ४१ पदे भरण्यात येणार आहेत.
वयोमर्यादा
विभागातील पद भरतीसाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि उमेदवारांचे कमाल वय ४० वर्षे असावे.
अर्ज फी
उमेदवारांना १०० अर्ज शुल्क जमा करावे लागेल. तथापि, सर्व महिला आणि ट्रान्सजेंडर उमेदवार तसेच सर्व SC/ST उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता
उमेदवार १०वी उत्तीर्ण असावा. गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजीमध्ये दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने दहावीपर्यंत स्थानिक भाषेत शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
इतर पात्रता: उमेदवारांना संगणक, सायकल चालवण्याचे ज्ञान असावे.
एवढा मिळेल पगार
शाखा पोस्ट मास्टर (BPM) पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना १२ हजार ते २९,३८० रुपये पगार मिळेल. सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर (ABPM), डाक सेवक (डाक सेवक) या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना १० हजार ते २४,४७० रुपये वेतन मिळेल.
असा करा अर्ज
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- indiapostgdsonline.gov.in ला भेट द्या.
मुख्यपृष्ठावरील नोंदणी लिंकवर क्लिक करा.
नोंदणी करा आणि अर्जासह पुढे जा.
अर्ज फी भरा आणि सबमिट करा.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
फॉर्म डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी प्रिंटआउट घ्या.
ssc job recruitment vacancy opportunity government
india post