पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्याच्या काळात सरकारी किंवा निमशासकीय नोकरीची कमतरता दिसून येते. त्यातच दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांना तर नोकरी मिळणे कठीण झाले आहे. परंतु आता त्यांना देखील ही संधी प्राप्त होऊ शकते. कारण Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) ने भोपाळसाठी विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यात अत्यावश्यक पात्रता असलेले पात्र उमेदवार 21 एप्रिल 2022 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 86 रिक्त जागा भरल्या जातील. यामध्ये मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन (MTR) च्या 34 पदे, तांत्रिक सहाय्यक व तंत्रज्ञ च्या 41 पदे, कॅशियर 06 पदे, सिनियर मेकॅनिक 01 पद, रेडिओग्राफिक टेक्निशियन ग्रेड II ची 01 पदे आणि लॅब अटेंडंट ग्रेड II च्या 03 पदांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता:
– लॅब अटेंडंट: मान्यताप्राप्त मंडळाकडून 12 वी किंवा डिप्लोमा.
– रोखपाल: मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी.
– वरिष्ठ मेकॅनिक: मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10वी/ITI/डिप्लोमा.
– इतर पदे: मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून B.Sc./वर्ग 12वी/डिप्लोमा.
पगार
मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना २३,५५० रुपये, कॅशियर पदासाठी २३,५५० रुपये,
वरिष्ठ मेकॅनिक पदासाठी २३,५५० रुपये, तांत्रिक सहाय्यक/ तंत्रज्ञ पदासाठी ३३,४५० रुपये,
रेडिओग्राफिक तंत्रज्ञ पदासाठी ३३,४५० रुपये,
तंत्रज्ञ पदासाठी ३३,४५०
लॅब अटेंडंटच्या पदासाठी उमेदवारांना १९,९०० रु.
असा करा अर्ज
उमेदवाराला अधिकृत वेबसाइट http://www.becil.com किंवा https://becilregistration.com वरच अर्ज करावा लागेल. यासाठी त्यांच्याकडे वैध वैयक्तिक ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे वैयक्तिक ई-मेल आयडी नसल्यास, ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी त्याने/तिने नवीन ई-मेल आयडी तयार करावा.









