पुणे – सध्या कोरोनाच्या काळात अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट आले असून त्यांच्या मुलांचे शिक्षण देखील थांबले आहे. त्यामुळे बहुतांश मुले केवळ दहावी बारावी उत्तीर्ण झाले असून बेरोजगार आहे. परंतु त्यांना आता शासकीय नोकरीत देखील संधी मिळणार आहे. कारण सध्या पाच शासकीय संस्थांमध्ये नोकरभरती होणार आहे. अनेक सरकारी संस्था आहेत 10 वी, 12 वी आणि पदवीधर उमेदवारांना संधी देत आहेत. या नोकरी साठी उमेदवार ऑनलाईन सुरू करू शकतात.
ट्रेड, टेक्निशियन अप्रेंटिस आणि डीईओ भरती
सध्या शासकीय ट्रेड / टेक्निशियन अप्रेंटिस आणि डीईओ भरतीसाठी प्रक्रिया सुरू आहे. यात 469 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. बारावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. भरतीची अधिसूचना पाहण्यासाठी संबंधित लिंकवर क्लिक करा.
पूर्व मध्य रेल्वे भरती
पूर्व मध्य रेल्वेने ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी एकूण 2206 रिक्त पदे भरणार आहेत. यात फिटर, वेल्डर, टर्नर, सुतार, पेंटर, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमन, रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक यासह अनेक ट्रेडसाठी या नेमणुका केल्या जातील. यासाठी मान्यताप्राप्त संस्था किंवा बोर्डाकडून किमान 50 टक्के गुणांसह 10 वीची परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र प्राप्त असावा.
दिल्ली पोस्टल सर्कल भरती
दिल्ली पोस्टल सर्कलने 221 पोस्टल असिस्टंट किंवा शॉर्टिंग असिस्टंट, एमटीएस पदांच्या पदांसाठी अर्ज मागवले केले आहेत. दहावी-बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
कश्मिरमध्ये फलोत्पादन तंत्रज्ञ
जम्मू आणि कश्मिर सेवा निवड मंडळ (JKSSB) ने 462 कनिष्ठ अभियंता, फलोत्पादन तंत्रज्ञ, कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. बारावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
दिल्ली पोलीस भरती
दिल्ली पोलीस विभागात विविध पदांसाठी रिक्त जागा आहेत. पोलीस कर्मचारी निवड आयोगाने वेबसाइटवर दिल्ली पोलीस आणि सीएपीएफ मध्ये सब इन्स्पेक्टर भरतीसाठी डेटा जारी केला आहे. दिल्ली पोलिसात उपनिरीक्षकांची एकूण 211 पदे भरण्यात येणार आहेत.