मुंबई – इयत्ता १०वी किंवा १२वी उत्तीर्ण झालेल्या आणि नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी गुडन्यूज आहे. भारतीय पोस्ट विभागाने महाराष्ट्रात विविध पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता त्वरीत सर्व माहिती बघावी आणि अर्ज करावा.
इंडिया पोस्ट भर्ती २०२१ मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र सर्कलमध्ये पोस्टमन, पोस्टल असिस्टंट, शॉर्टनिंग असिस्टंट आणि MTS या २५७ पदांच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. भारतीय पोस्टची ही भरती क्रीडा कोट्यातील उमेदवारांसाठी आहे. इंडिया पोस्ट स्पोर्ट्स कोटा पोस्टमन भरती २०२१ महाराष्ट्रासाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले असून उमेदवार २७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. त्याकरिता dopsportsrecruitment.in वर अर्ज करता येतील. महाराष्ट्र सर्कलमध्ये पोस्टमन, पोस्टल असिस्टंट आणि MTS या पदांसाठी भरती, सुरू असून यात प्रामुख्याने स्पोर्ट्स कोट्यातील उमेदवारांना संधी मिळेल. खास म्हणजे या नोकरीत उमेदवारांना ८१ हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
महाराष्ट्रातील टपाल खात्यात सध्या अनेक जागा रिक्त असून टपाल कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे त्यासाठीच ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी एकूण २५७ रिक्त पदांपैकी ९३ पदे पोस्टल सहाय्यक, ९ शॉर्टनिंग असिस्टंट, ११३ पोस्टमन आणि ४२ MTA साठी आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना संपूर्ण भरती अधिसूचना तपासण्याचा सल्ला दिला जातो.
भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा
– भरती अधिसूचना प्रकाशन तारीख – २८ ऑक्टोबर २०२१
– ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख – २८ ऑक्टोबर २०२१
– ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ नोव्हेंबर २०२१ अशी आहे.
– वयोमर्यादा:- पोस्टल असिस्टंट/पोस्टमनसाठी १८ ते २७ वर्षे आणि MTS साठी १८ ते २५ वर्षे अशी आहे.
– अर्ज फी – २०० रुपये आहे.