मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. शिक्षणमंत्र्यांच्या घराला घेराव घालण्यात आल्यामुळे ही बाब राज्यात चर्चेची ठरत आहे. ऑफलाईन परीक्षा घेऊ नयेत, ऑनलाईन स्वरुपातच परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.
मंत्र्यांच्या घराबाहेर विद्यार्थी जमायला लागले. कोरोना निर्बंध आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी विद्यार्थ्यांना पांगवण्याचा प्रश्न प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. सर्व विद्यार्थी जोरदार घोषणा बाजी करीत आहेत. गेल्या अनेक तासांपासून सुरू असलेले हे आंदोलन अद्याप मिटलेले नाही. कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षेची मागणी आहे. आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले आहे.
https://twitter.com/ANI/status/1488112340298264578?s=20&t=RfoAMWckhKf_0aZzdhdBJw