मुंबई – इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केले आहे. इयत्ता बारावीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या दरम्यान तर इयत्ता दहावीची परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या दरम्यान होणार आहे. यासंदर्भातील घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. मात्र, कोणत्या दिवशी कोणता पेपर होईल, याचे विस्तृत वेळापत्रक आज प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता परीक्षेच्या अभ्यासाचे अचूक नियोजन करता येणार आहे.
या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी ३१ मार्च ते ९ एप्रिल २०२२ असा असेल. प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ३१ मार्च ते २१ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जून २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.
इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/ अंतर्गत गुणांच्या परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ५ एप्रिल ते २५ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता दहावीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा ५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जुलै २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.
खालील लिंकवर क्लिक करुन आपल्याला परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक पाहता येईल
https://mahahsc.in/notification/ssc_m22_1.pdf